AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही तिकीट काढत नसतो’ म्हणणाऱ्या खोडकर प्रवाशांना Conductorनं दाखवला इंगा! Funny video viral

Conductor vs Passenger : सोशल मीडिया (Social media) जणू विनोदी (Funny) व्हिडिओंचं भांडार झालंय. इथे एकापेक्षा एक असे विनोदी व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

'आम्ही तिकीट काढत नसतो' म्हणणाऱ्या खोडकर प्रवाशांना Conductorनं दाखवला इंगा! Funny video viral
तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांना कंडक्टरनं घडवली अद्दल Image Credit source: Youtube
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Mar 07, 2022 | 8:30 AM
Share

Conductor vs Passenger : सोशल मीडिया (Social media) जणू विनोदी (Funny) व्हिडिओंचं भांडार झालंय. इथे एकापेक्षा एक असे विनोदी व्हिडिओ व्हायरल (Viral) होत असतात. काही व्हिडिओ हलकेफुलके असतात. तर काही व्हिडिओ विनोदी असतात मात्र विचारही करायला लावतात. तरुणांचे विनोदी व्हिडिओ तर सध्या खूप जास्त पसंतीनं पाहिले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. तरुणांमध्ये व्यायामाची आवड अलिकडच्या काळात चांगलीच वाढीला लागली आहे. बॉडी बनवणे आणि मग त्या आधारावर इतरांवर छाप पाडणे ज्याला आपण इम्प्रेशन पाडणे असं म्हणतो, ते प्रकार व्हायला लागतात. इतरांना आपली बॉडी दाखवणे आणि त्याआधारावर त्यांना खिजवणे किंवा कमी लेखणे असे प्रकार आपण नेहमी पाहतो. त्याच विषयावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हा विनोदी व्हिडिओ असून यूझर्सना खूप आवडलाय.

बॉडी दाखवून खिल्ली उडवतात…

व्हिडिओमध्ये आपल्याला तीन तरूण दिसतात. दोन तरूण प्रवासी तर एक कंडक्टर म्हणजेच वाहक दाखवलाय. कंडक्टर त्याचं तिकीट काढण्याचं काम करत असतो. हे करत असताना तो त्या दोघांकडे येतो. त्यांना तिकीट काढायला सांगतो. ते म्हणतात, आम्ही तिकीट काढत नसतो. हे बोलत असताना ते आपली बॉडी, बायसेप्स दाखवतात. कंडक्टर हताश होऊन परत जातो. दुसऱ्या दिवशीही तेच… मग कंडक्टर विचार करतो. मनातल्या मनात बॉडी करण्याचं ठरवतो. यात दोन महिने जातात. त्यानंतर पुन्हा तेच प्रवासी आणि तोच कंडक्टर.. पण मग काय होतं? हा व्हिडिओ पाहा…

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर अझीद अली टीबीसी (Azid Ali TBC) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. ‘Conductor vs Passenger’ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलीय. 2 मार्चला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. याला यूझर्सनी पसंती दिली. याचे व्ह्यूज वाढत असून आतापर्यंत 4.4 मिलियनहून अधिकजणांनी तो पाहिला आहे. अनेकांनी हसणाऱ्या इमोजी कमेंट्स केल्या आहेत. (Video courtesy – Azid Ali TBC)

आणखी वाचा :

Viral video : ‘हे’ सर्वजण अख्ख्या रेल्वेला का ओढत आहेत? कारण ऐकून आश्चर्यचकित व्हाल आणि कौतुकही कराल

अरुंद जागेतून कार बाहेर काढण्याचा Stunt पडला महागात; पाहा, पुढे काय झालं?

घराच्या बांधकामात ‘असा’ जुगाड कधी पाहिला नसेल, Photo viral

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल