Viral video : ‘हे’ सर्वजण अख्ख्या रेल्वेला का ओढत आहेत? कारण ऐकून आश्चर्यचकित व्हाल आणि कौतुकही कराल

The power of unity : एकीचे बळ काय असते, हे लहानपणापासून आपण शिकत आलो आहोत. असाच एक प्रेरणादायी (Inspirational) व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये काही लोक ट्रेनला धक्का देताना दिसत आहेत.

Viral video : 'हे' सर्वजण अख्ख्या रेल्वेला का ओढत आहेत? कारण ऐकून आश्चर्यचकित व्हाल आणि कौतुकही कराल
सर्वजण रेल्वेडब्याला ओढताना
Image Credit source: Twitter
प्रदीप गरड

|

Mar 06, 2022 | 1:26 PM

The power of unity : एकीचे बळ काय असते, हे लहानपणापासून आपण शिकत आलो आहोत. लहानपणी तुम्ही कथा ऐकली असेल, एका शेतकऱ्याची 4 मुले राहतात, पण त्यांच्यात वैर असायचे. छोट्या छोट्या गोष्टीवरून ते आपापसात भांडत असत. मग शेतकऱ्याने त्यांना एकत्र राहण्यासाठी आणि एकतेची शक्ती समजावून सांगण्यासाठी उपाय केला. त्यांनी प्रथम त्यांना 1-1 लाकडे तोडण्यासाठी दिली, जी त्यांनी सहजपणे तोडली, परंतु त्यानंतर शेतकर्‍याने त्यांना लाकडाचा गठ्ठा दिला, जो प्रत्येकाने एक एक करून तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही तोडू शकले नाही. यानंतर शेतकऱ्याने त्यांना सांगितले की येथेच एकीची शक्ती आहे. असाच एक प्रेरणादायी (Inspirational) व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये काही लोक ट्रेनला धक्का देताना दिसत आहेत.

लोकांनी मिळून ट्रेन ढकलली

आता तुम्ही विचार करत असाल, की लोक ट्रेनला ढकलत आहेत, पण का? जेव्हा तुम्हाला त्यामागील सत्य कळेल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्या लोकांचे कौतुक वाटेल, जे ट्रेनला धक्का देतात. ही घटना मेरठची आहे, जिथे ट्रेनला अचानक आग लागली, त्यानंतर प्रवाशांनी मिळून ट्रेनला धक्का दिला आणि ट्रेनला जळत्या बोगीपासून वेगळे केले. हीच एकजुटीची ताकद आहे, की लोकांनी मिळून ट्रेन ढकलली.

ट्विटर हँडलवर शेअर

हा हृदयस्पर्शी व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अद्भुत गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘आम्ही एकजुटीने पर्वत हलवू शकतो, ती तर ट्रेन होती… मेरठमध्ये ट्रेनला आग लागली तेव्हा प्रवाशांनी एकत्र ढकलून ट्रेनला जळत्या बोगीपासून वेगळे केले… त्यांच्या मदतीची भावना आणि एकजुटीचा प्रयत्न होता. त्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे!’.

‘एकीत शक्ती’

45 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 81 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 13 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की एकीत शक्ती असते, तर दुसऱ्या यूझरने लोकांच्या साहसाला सलाम केला आहे.

आणखी वाचा :

अरुंद जागेतून कार बाहेर काढण्याचा Stunt पडला महागात; पाहा, पुढे काय झालं?

घराच्या बांधकामात ‘असा’ जुगाड कधी पाहिला नसेल, Photo viral

9 महिन्यांच्या गर्भवतीप्रमाणं वाढलंय या व्यक्तीचं पोट! कशामुळे झालंय असं? ‘ही’ बातमी वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें