9 महिन्यांच्या गर्भवतीप्रमाणं वाढलंय या व्यक्तीचं पोट! कशामुळे झालंय असं? ‘ही’ बातमी वाचा

Man looks nine months pregnant : एखादे ऑपरेशन म्हणजेच शस्त्रक्रिया (Operation) केल्यानंतर त्याचे साइड इफेक्ट झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो. अशीच एक बातमी सध्या व्हायरल (Viral) झाली आहे. हर्नियाच्या (Hernia) ऑपरेशनमुळे पुरूष कठीण अवस्थेतून जात आहे.

9 महिन्यांच्या गर्भवतीप्रमाणं वाढलंय या व्यक्तीचं पोट! कशामुळे झालंय असं? 'ही' बातमी वाचा
ऑपरेशननंतर इसमाचं वाढलेलं पोट
Image Credit source: Twitter
प्रदीप गरड

|

Mar 06, 2022 | 11:54 AM

Man looks nine months pregnant : एखादे ऑपरेशन म्हणजेच शस्त्रक्रिया (Operation) केल्यानंतर त्याचे साइड इफेक्ट झाल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशीच एक बातमी सध्या व्हायरल (Viral) झाली आहे. हर्नियाच्या (Hernia) ऑपरेशनमुळे 46 वर्षीय पुरूष अत्यंत कठीण अवस्थेतून जात आहे. हर्नियामुळे त्या व्यक्तीचे पोट इतके फुगले आहे, की तो एखाद्या गर्भवतीप्रमाणे दिसत आहे. गॅरी उरीयन (46) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यास फेब्रुवारी 2021 मध्ये रॉदरहॅम हॉस्पिटलमध्ये A&Eमध्ये नेण्यात आले होते. तो व्यक्ती पोटदुखीच्या वेदनांमुळे ओरडत होता. तिथे अॅपेन्डिसाइटिसचे निदान झाले. त्या व्यक्तीची पत्नी ज्युलिया हिचा दावा आहे, की त्याच्यावर शस्त्रक्रिया होण्यासाठी एक दिवसापेक्षा जास्त वेळ लागला. तिने यॉर्कशायर लाइव्हला सांगितले, की आपला पती 24 तासांहून अधिक काळ A&Eमध्ये होता आणि नंतर त्यांनी त्याला MRIसाठी नेले आणि त्यामुळेच त्यांना कळले, की त्याला अॅपेन्डिसाइटिस आहे.

‘…तर जीवावर बेतले असते’

त्यांनी दोनदा ऑपरेशन टाळण्याचा प्रयत्न केला. तिसर्‍यांदा ते पुन्हा ऑपरेशन रद्द करण्यासाठी आले, तेव्हाच तो कोलमडला कारण त्याचे अपेंडिक्स फुटले होते. त्यानंतर त्याला तत्काळ शस्त्रक्रियेसाठी नेले गेले. यावेळी डॉक्टर म्हणाले, की तू खूप भाग्यवान आहेस. शस्त्रक्रियेस उशीर झाला असता, तर जीवावर बेतले असते.

‘लाजेमुळे बाहेरही पडत नाही’

ज्युलियाने सांगितले, की शस्त्रक्रियेनंतर अॅपेन्डिसाइटिस काढण्यात आला, मात्र यानंतर गॅरीचे मोठे आतडे Abdominal Wallमधून बाहेर आले. त्यामुळे त्याला खूप मोठा हर्निया झाला. तो इतका मोठा आहे, की लोक गॅरीला 9 महिन्यांची गर्भवती समजतात. ज्युलियाच्या म्हणण्यानुसार, गॅरी लाजेमुळे घर सोडत नाही, कारण लोक त्याच्याकडे बघतात. ती म्हणते, की पूर्वी जिथे गॅरीकडे 34 आकाराची जीन्स असायची तिथे आता त्याला 54 आकाराची जीन्स बसते. फुगलेल्या पोटामुळे त्यांना नीट वाकताही येत नाही. सध्या, ज्युलिया अजूनही तिच्या पती गॅरीच्या शस्त्रक्रियेची वाट पाहत आहे.

आणखी वाचा :

Viral : हृदयात धडधड, तोंडातून फेस आणि अखेर मृत्यू; असं काय केलं ‘या’ प्रशिक्षकानं?

Cancer patient ठणठणीत..! डॉक्टर म्हणाले होते, 8 महिन्यांत मरशील! नेमकं काय Follow केलं त्यानं? वाचा सविस्तर

‘या’ ऑटोवाल्याची Creativity तर पाहा; लोक म्हणतायत, मुद्दा Global पण विचार Local!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें