Viral : हृदयात धडधड, तोंडातून फेस आणि अखेर मृत्यू; असं काय केलं ‘या’ प्रशिक्षकानं?

कॅफीनच्या ओव्हरडोसमुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यूकेमधल्या रुथीन इथं हा प्रकार घडलाय. टॉम मॅन्सफिल्ड (Tom Mansfield), कोल्विन बे येथे राहणारा 29 वर्षीय व्यक्ती हा वैयक्तिक प्रशिक्षक (Trainer) होता.

Viral : हृदयात धडधड, तोंडातून फेस आणि अखेर मृत्यू; असं काय केलं 'या' प्रशिक्षकानं?
कॅफीनच्या अतिसेवनामुळे टॉम मॅन्सफिल्डचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 12:02 PM

Caffeine overdose : कॅफीनच्या ओव्हरडोसमुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यूकेमधल्या रुथीन इथं हा प्रकार घडलाय. टॉम मॅन्सफिल्ड (Tom Mansfield), कोल्विन बे येथे राहणारा 29 वर्षीय व्यक्ती हा वैयक्तिक प्रशिक्षक (Trainer) आणि दोन मुलांचा पिता होता. त्यानं कॅफीन पावडर (Caffeine powder) चुकीच्या पद्धतीनं घेतल्यानं ही घटना घडलीय. 5 जानेवारी 2021 रोजी त्यानं हे ड्रिंक घतल्यानंतर तो आजारी पडला, असं बीबीसीच्या वृत्तात म्हटलं आहे. साधारणपणे जीममध्ये जाणारे सहसा आपल्या कामगिरीला चालना देण्यासाठी विशिष्ट डोसमध्ये शिफारस केलेले कॅफिन वापरतात. तज्ज्ञ शिफारस केलेल्या प्रमाणाच्या मर्यादेत राहण्याचा इशारा देतात. मॅन्सफिल्डनं त्याच्या पावडरचं वजन करण्यासाठी स्वयंपाकघरातील तराजूचा वापर केला होता, ज्याचे प्रमाण 2 ते 5000 ग्रॅम इतकं होतं, तर त्याला शिफारस केलेला डोस 60-300 मिलीग्राम दरम्यान घ्यायचा होता.

पोस्टमॉर्टम तपासणी अहवालातली धक्कादायक माहिती

ब्लॅकबर्न डिस्ट्रिब्युशनकडून 100 ग्रॅम पावडरचा पॅक खरेदी केला होता. 60-300mg एवढं प्रमाण दिवसातून दोनदा घ्यायचं असतं. मात्र मॅन्सफिल्डनं त्यापेक्षा खूप अधिक ते घेतलं. मॅन्सफिल्डच्या पोस्टमॉर्टम तपासणी अहवालात कॅफीनची पातळी प्रति लिटर रक्तात 392 मिलीग्राम असल्याचे नमूद आहे, तर एक कप कॉफी पिण्यापासून सामान्य पातळी सुमारे दोन ते चार मिलीग्राम प्रति लिटर असते.

डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण…

कॅफीन पावडर प्यायल्यानंतर टॉम मॅन्सफिल्डला हृदयाची धडधड, छातीत दुखणे आणि तोंडात फेस येण्याचा अनुभव आल्यानं त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जेव्हा पॅरामेडिक्स त्याच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी सुमारे एक तास त्याला पुन्हा शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं.

आणखी वाचा :

Genius dog : मालकाची Copy का करतोय ‘हा’ कुत्रा? Funny video viral

Viral video : सुपर से भी ऊपर! ‘या’ मुलीचं शरीर रबराचं बनलंय की काय? पाहा ही Flexibility

Video | युक्रेनियन्सचा हिरो राष्ट्राध्यक्ष असूनही जेव्हा खूर्ची उचलतो आणि पत्रकारांशी हात मिळवतो!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.