Cancer patient ठणठणीत..! डॉक्टर म्हणाले होते, 8 महिन्यांत मरशील! नेमकं काय Follow केलं त्यानं? वाचा सविस्तर

Cancer patient survived story : पाब्लो केली (Pablo Kelly) असं या व्यक्तीचं नाव आहे. डॉक्टरांनी (Doctor) त्यांना केमोथेरपी (Chemotherapy) करण्याचा सल्ला दिला. पण त्यानं ती मान्य केली नाही. त्याऐवजी पाब्लोनं विशेष केटो आहाराची निवड केली.

Cancer patient ठणठणीत..! डॉक्टर म्हणाले होते, 8 महिन्यांत मरशील! नेमकं काय Follow केलं त्यानं? वाचा सविस्तर
केटो डाएट फॉलो करून कर्करोगाशी लढणारा पाब्लो केली
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 12:45 PM

Cancer patient survived story : एका तरुणाला कर्करोग झाला… आता या आजारावर उपचार करता येणार नाहीत… तो फक्त 6 ते 8 महिनेच जगू शकेल, असं डॉक्टरांनी सांगितलं… मात्र अजूनही ती व्यक्ती जिवंत आहे. होय… ही चमत्कारिक घटना इंग्लंडमधली आहे. मात्र यामध्ये त्या व्यक्तीनं घेतलेले कष्ट सर्वात महत्त्वाचे आहेत. पाब्लो केली (Pablo Kelly) असं या व्यक्तीचं नाव आहे. डॉक्टरांनी (Doctor) त्यांना केमोथेरपी (Chemotherapy) करण्याचा सल्ला दिला. पण त्यानं ती मान्य केली नाही. त्याऐवजी पाब्लोनं विशेष केटो आहाराची निवड केली. पाब्लो केली यानं दावा केला आहे, की केटो आहारामुळे त्याची तब्येत सुधारली आहे. पाब्लो म्हणतो, की माझी सध्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. त्यांना तो चमत्कार वाटतोय. तो म्हणतो, की मी खूप आनंदी आहे. तरीही तो केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीची शिफारस करतो.

कर्करोग कसा शोधला गेला?

पाब्लो केली म्हणतो, की सुरुवातीला डोकेदुखी होती. विशेषतः काम करत असताना, शारीरिक कष्ट करताना ही समस्या जास्त जाणवत होती. सुरुवातीच्या काळात, पाब्लोनं वेदनांकडे दुर्लक्ष केलं. पण हे वाढू लागलं तेव्हा त्याला समजलं, की प्रत्यक्षात एक मोठी आणि गंभीर समस्या आहे. plymouthherald.co.ukच्या अहवालानुसार त्याला कर्करोग झाल्याचं निदान झालं. कॅन्सरचा रिपोर्ट मिळाल्यावर हॉस्पिटलने त्याला लवकरात लवकर रेडिओलॉजिकल उपचार घेण्याचा सल्ला दिला. पाब्लो सांगतो, की रेडिओलॉजीची तयारी सुरू झाली आहे. डोकं आणि दाढी काढली होती. पण नंतर त्याला समजलं, की तो हे करू शकत नाही.

इतरांना प्रेरणा देतो

पाब्लोने सांगितलं, की त्यानं ऑन्कोलॉजिस्टशी बोलण्याचा निर्णय घेतला. 2014मध्ये त्याला सांगण्यात आलं होतं, की तो उपचार घेऊन आणखी 12 ते 13 महिने जगू शकेल. अन्यथा, 6 ते 8 महिन्यांत मृत्यू होऊ शकतो. पण पाब्लोनं ठरवलं, की तो वेगळा मार्ग पत्करेल. मग पाब्लोनं कार्बोहायड्रेट्स नसलेले पदार्थ खाण्यास सुरुवात केली. त्यानं दावा केला, की यामुळे त्याच्या ट्यूमरचा आकार कमी झाला आणि डॉक्टरांना शस्त्रक्रिया करून तो ट्यूमर काढणं सोईचं गेलं. त्यानंतर त्याच्या मेंदूवर दोनदा गुंतागुंतीच्या आणि लांबलचक शस्त्रक्रिया झाल्या. 2017मध्ये त्याचं पहिलं ऑपरेशन झालं. पाब्लो म्हणतो, की तो अजूनही टर्मिनल मेंदूच्या कर्करोगानं ग्रस्त आहे, परंतु आता तो इतर कर्करोगाच्या रुग्णांना चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत आहे. आपल्या जीवनातल्या अनुभवांमुळे तो इतर लोकांना मदत करत आहे.

काय आहे केटो डाएट?

केटो डाएट अलीकडेच फिटनेस इन्फ्लूएंसर्सनी लोकप्रिय केला आहे. त्यामुळे वजन कमी होत असल्याचा दावा केला जातो. दरम्यान, कर्करोगावर उपचार करण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी डॉक्टरांनी अधिकृतपणे केटो आहाराची शिफारस केलेली नाही.

आणखी वाचा :

Viral : हृदयात धडधड, तोंडातून फेस आणि अखेर मृत्यू; असं काय केलं एका प्रशिक्षकानं?

Genius dog : मालकाची Copy का करतोय ‘हा’ कुत्रा? Funny video viral

Viral video : सुपर से भी ऊपर! ‘या’ मुलीचं शरीर रबराचं बनलंय की काय? पाहा ही Flexibility

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.