Video | नदीच्या मधोमध करत होता सुनील शेट्टीची नक्कल, गर्लफ्रेंडने मारली लाथ, पाहा पुढे काय झालं…

या व्हिडीओत दोघेजण नदीच्या मध्यभागी बसले दिसत आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या डायलॉग्सवर तरुणी लिपसिंक करत आहे.

Video | नदीच्या मधोमध करत होता सुनील शेट्टीची नक्कल, गर्लफ्रेंडने मारली लाथ, पाहा पुढे काय झालं...
viral Video
| Edited By: | Updated on: May 22, 2021 | 4:04 PM

मुंबई : सध्या एका जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्हालादेखील पोट दुखेपर्यंत हसू येईल… या व्हिडीओत गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड दोघे मिळून एका चित्रपटाचे दृश्य पुन्हा रिक्रिएट करत आहेत. या जोडप्यातील तरुण अभिनेता सुनील शेट्टी बनला आहे, तर त्याची मैत्रीण अभिनेत्री शिल्पा शेट्टी बनली आहे. सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांचा गाजलेला ‘धडकन’ (Dhadkan) या चित्रपटाचे संवाद दोघेही बोलत आहेत. मात्र, पुढे असे काहीतरी घडते ज्यामुळे लोक पोट धरून हसू लागतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे (Couple Lipsync video on Dhadakan film dialogue gone Viral on social media).

पाहा ‘हा’ व्हिडीओ

या व्हिडीओत दोघेजण नदीच्या मध्यभागी बसले दिसत आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या डायलॉग्सवर तरुणी लिपसिंक करत आहे. लिपसिंक करताना ती बोलते, बार-बार मेरे करीब आने की कोशिश करते हो. दूर रहो मुझसे…’ त्यानंतर ती तिच्या मित्राला मागून जोरदार धक्का मारते. सुनील शेट्टीचा अभिनय करणारा हा तरुण त्या नदीत वाहू लागतो आणि नंतर उठून पळून जातो.

पतंजलि_ऑफिशियल नावाच्या पेजने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, तो सध्या बराच शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ 17 मार्च रोजी शेअर केला गेला होता, ज्याने आतापर्यंत 1.7 दशलक्ष व्हुव्ज मिळवले आहेत. यासह जवळपास लाख लाईक्सही या व्हिडीओला मिळाल्या आहेत. कमेंटमध्येही लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मजेशीर कमेंट

एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी अजूनही हसत आहे. छान व्हिडीओ’ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘कुठून कुठे पोहचलात तुम्ही…?’ तिसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की, ‘मुलीने आणखी जोराने लाथ मारायला हवी होती… म्हणजे त्याने नदी तरी पार केली असती.’ सध्या या व्हिडीओवर खूप लोक खूप कमेंट्स करत आहेत.

(Couple Lipsync video on Dhadakan film dialogue gone Viral on social media)

हेही वाचा :

VIDEO | प्रबळ इच्छाशक्तीपुढे दिव्यांगत्वही हरलं, व्हिडीओ पाहून अरविंद केजरीवाल म्हणाले…

5 सेकंदात चितपट ! शिंगावर उचलताच सिंहाला पळता भूई थोडी, व्हिडीओ पाहाच