Video | हा कावळा चक्क बोलतो, पाहा नेमकं काय म्हणतो ?

हा कावळा माणसासारखं बोलून चक्क हाय, हॅलो करतो आहे. कावळ्याची ही करामत पाहून अनेकजण हैराण होत आहेत. (crow speak english say hi hello video)

Video | हा कावळा चक्क बोलतो, पाहा नेमकं काय म्हणतो ?
CROW SPEAKING ENGLISH

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यामध्ये माणसांच्या करामतीचे तसेच प्राण्यांचे व्हिडीओसुद्धा असतात. यापैकी प्राण्यांचे व्हिडीओ नेटकऱ्यांकडून आवडीने पाहिले जातात. सध्या एका कावळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा कावळा माणसासारखं बोलून चक्क हाय, हॅलो करतो आहे. कावळ्याची ही करामत पाहून अनेकजण हैराण होत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसूसुद्धा फुटत आहे. (crow speak English say hi hello video goes viral)

व्हिडीओमध्ये नेमकं काय ?

आतापर्यंत आपण अनेक कावळे पाहिलेले आहेत. हे सर्व कावळे ‘काऊ काऊ’ करताना आपण सर्रासपणे पाहिले असतील. मात्र, व्हिडीओमधील हा कावळा चक्क हाय हॅलो बोलत आहे. विश्वास बसणार नाही. पण हा कावळा माणसाशी संवाद साधतोय. त्याला हाय केल्यानंतर हा कावळा चक्क हाय आणि हॅलो बोलत आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे.

व्हिडीओमध्ये हा कावळा एका महिलेच्या हातावर बसला आहे. ती महिला या कावळ्याशी संवाद साधत आहे. जेव्हा ही महिला कावळ्याला हाय, हॅलो करत आहे. त्याला लगेच प्रत्युत्तर म्हणून हा कावळा मोठ्या दिमाखात या महिलेला हाय, हॅलो म्हणत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओला त्यांनी मजेदार कॅप्शनसुद्धा लिहले आहे. काही क्षणात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत दोन हजार वेळा त्याला पाहिले गेले असून 200 पेक्षा जास्त जणांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओला पाहून अनेक लोक मजेदार कमेंट्ससुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

LIVE | उद्यापासून व्यापाऱ्यांच्या दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करू, अजित पवारांची महत्त्वाची माहिती

हे फक्त हात नाहीत, जगण्याची आशा आहेत, महामारीतलं काळीज चिरणारं वास्तव

कोरोना लस घ्या, फ्री बियर मिळवा; ‘या’ शहरात सुरु आहे बंपर ऑफर

(crow speak English say hi hello video goes viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI