AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | प्रेयसीची आठवण आली, अन् तरुण हमसून हमसून रडायला लागला, नेटकरी म्हणतायत हेच खर्ऱर्रर्ऱ प्रेम, व्हिडीओ पाहाच

विरहाचे आणि प्रेमभंगाचे गीत ऐकल्यानंतर एका तरुणावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या व्हिडीओमध्ये तो हमसून हमसून रडताना दिसतोय. (young boy cried listen sad love song)

Video | प्रेयसीची आठवण आली, अन् तरुण हमसून हमसून रडायला लागला, नेटकरी म्हणतायत हेच खर्ऱर्रर्ऱ प्रेम, व्हिडीओ पाहाच
गाण्याचे बोल कानावर पडताच या तरुणाला अशा प्रकारे अश्रू अनावर झाले.
| Updated on: Apr 08, 2021 | 8:35 PM
Share

मुंबई : प्रेम ही अमर्याद अशी संकल्पना आहे. प्रेमाला देशाच्या, प्रांताच्या, जातीच्या सीमा नसतात. असं म्हणतात की प्रेम हे कधीही आणि कोणावरही होऊ शकतं. प्रेमाच्या प्रवासात अनेकांना आपलं-आपलं प्रेम भेटतं. आपल्या अवतीभोवती लव्ह मॅरेज करुन संसार फुलवाणारे अनेक कपल्स आपल्याला दिसतील. मात्र, अशासुद्धा काही व्यक्ती असतात ज्यांना प्रेमात ठेच लागलेली असते किंवा कोणत्यातरी कारणामुळे त्या व्यक्तीला आपला जोडीदार भेटू शकलेला नसतो. हवा तो जोडीदार न मिळाल्यामुळे अनेकजण दु:खात आकंठ बुडालेले आपण अनेकवेळा पाहिले असतील. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विरहाचे आणि प्रेमभंगाचे गीत ऐकल्यानंतर या तरुणावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या व्हिडीओमध्ये तो हमसून हमसून रडताना दिसतोय. (young boy cutting hair cried when listen the sad love song of Sonu Nigam)

व्हिडीओमध्ये नेमकं काय ?

हा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये दिसतं त्याप्रमाणे एक तरुण आपले केस कापण्यासाठी केश कर्तनालयामध्ये बसलेला आहे. हेअर कटर या तरुणाचे केस कापतो आहे. त्याच्या बाजूला हेअर सलूमध्ये आणखी काही व्यक्ती बसलेल्या आहेत. हेअर कटर तरुणाचे केस कापत असताना बाजूला एक गाणे सुरु आहे. सोनू निगमच्या आवाजातील हम तुम्हारे है समन या चित्रपटातील हे गाणे आहे.

…आणि तरुणाच्या अश्रूंना बांध फुटला

व्हिडीओमध्ये हेअर कटर समोर बसलेल्या तरुणाचे केस कापत आहे. यावेळी बाजूला सोनू निगमच्या आवाजात विरहगीत सुरु असल्यामुळे सर्वत्र शांतता पसरलेली दिसतेय. याच वेळी “अजनबी तूम हो जाऊ, गैर हम हो ना सकेंगे, किसी बेगाने की खातीर तुमने अपनो को भुला दिया,” हे बोल असलेल्या ओळी सोनू निगम गाताना गातोय. या ओळी केस कापायला बसलेल्या तरुणाच्या कानी पडताच तो अचानकपणे रडताना दिसतोय. बरं तो हळूवार, नाजूकपणे रडतोय असं नाही, तर वरील बोल ऐकताच त्याच्या अश्रूंचा थेट बांध फुटतोय. केस कापायला बसलेला तरुण एवढा रडतोय की बाजूला उभ्या असलेल्या हेअर कटरलासुद्धा हसू आवरत नाहीये.

पाहा पूर्ण व्हिडीओ :

नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

या व्हिडीओमध्ये गाण्याचे बोल जसे जसे या तरुणाला ऐकायला येतायत तसंतसं हा तरुण रडताना दिसतोय. जीवाच्या आकांताने रडत असल्यामुळे कोणत्यातही मोठ्या विहरातून तो जात असावा किंवा त्याचा प्रेमभंग झाला असावा असा कयास नेटकऱ्यांकडून लावला जातोय. प्रेमात आकंठ बुडालेल्या या तरुणाविषयी अनेकांनी दु:ख व्यक्त केलंय. तर अनेकांना या व्हिडीओला पाहून हसूसुद्धा आवरलेलं नाहीये.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणांत तो व्हायरल झाला असून त्याची खमंग चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स तर चांगल्याच वाचण्यासारख्या आहेत.

इतर बातम्या :

World’s Longest Nails : ‘जगातील सगळ्यात लांब नखं असलेली महिला’, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

VIDEO | ज्येष्ठ नागरिकाचे जोरदार ठुमके पाहाचं, विरेंद्र सेहवाग म्हणतो ही तर आयपीएलची…

पैशाची कमी नाही, पण या गावातील लोक कपडेच घालत नाहीत? पर्यटकांनाही नियम लागू, रंजक कारण

(young boy cutting hair cried when listen the sad love song of Sonu Nigam)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.