हे फक्त हात नाहीत, जगण्याची आशा आहेत, महामारीतलं काळीज चिरणारं वास्तव

हे फक्त हात नाहीत, जगण्याची आशा आहेत, महामारीतलं काळीज चिरणारं वास्तव

कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स अर्थात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांनी अजूनही हार मानलेली नाही. ते ठामपणे उभे आहेत आणि अनेकांना लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत (Brazil nurses find unique way to give human touch to corona patients).

चेतन पाटील

|

Apr 09, 2021 | 6:53 PM

ब्राझेलिया : शर्यत अजून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलेलो नाही, अशी म्हण आपण ऐकली असेल. अगदी अशाच म्हणी सारखं जगभरातील कोव्हिड वॉरीयर कोरोना लढाईत उभे आहेत. कोरोनाने खूप छळलं. या संकटाने लाखो लोकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं. कित्येकांचा बळी घेतला. आजही हे संकट ओसरताना दिसत नाही. मात्र, या संकटाचा सामना करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स अर्थात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांनी अजूनही हार मानलेली नाही. ते ठामपणे उभे आहेत आणि अनेकांना लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत. या कोरोना वॉरीअर्सच्या कामाचा एक प्रेरणादायी फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय (Brazil nurses find unique way to give human touch to corona patients).

फोटोमागील गोष्ट काय?

सोशल मीडियावर सध्या ब्राझीलच्या कोव्हिड सेंटरमधला एक फोटो प्रचंड व्हायरल होतोय. या फोटोत एका रुग्णाच्या हातात दोन बनावट हात आहेत. आजारी असल्यावर रुग्णाला आपल्याजवळ बाजूला कुणीतरी जवळचं व्यक्ती असावं, असं वाटतं. असं वाटणं हे साहजिकच आहे. पण ते कोरोनामुळे शक्य नाही. अशा परिस्थितीत ब्राझीलच्या कोव्हिड सेंटरमधील नर्सेसने नामी शक्कल लढवली. त्यांनी हँडग्लोव्हसमध्ये कोमट पाणी भरलं. दोन्ही ग्लोव्हजच्या मध्यभागी त्यांनी रुग्णाचा हात ठेवला जेणेकरुन आपल्या शेजारी कुणीतरी जवळचं धीर देणारी व्यक्ती आहे, असं रुग्णाला वाटावं.

कोरोना काळात रुग्णाला सहवासाची गरज

कोरोना काळात एखादी जवळची व्यक्ती रुग्णासोबत रुग्णालयात राहणं अजिबात शक्य नाही. आपली जवळची व्यक्ती एकदा रुग्णालयात गेली की ती व्यक्ती बरी होऊनच घरी परतते. या काळात मोबाईल किंवा व्हिडीओ कॉलद्वारे नातेवाईक रुग्णाशी संपर्क साधतात. पण एखादा रुग्ण अत्यवस्थ असेल तर काय? अशावेळी रुग्णाला आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांना एकमेकांच्या धीराची, स्पर्शाची जास्त आवश्यकता असते. पण रुग्णालयात रुग्णाजवळ थांबणं हे अजिबात शक्य नाही. तिथे फक्त डॉक्टर, नर्सेस हेच पीपीई किट परिधान करुन राहू शकतात. ते रुग्णाची काळजी घेतात. आणि रुग्णांच्या नातेवाईकांचंही समुपदेशन करतात.

‘देवाचे हात’

गल्फ न्यूजचे पत्रकार सादिक समीर भट यांनी ब्राझीलच्या कोव्हिड सेंटरमधील फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी ‘देवाचा हाथ’ असं कॅप्शन दिलं आहे. ब्राझीलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांना दिलासा देण्यासाठी नर्सेसचा प्रयत्न. सलाम, असं सादिक समीर भट यांनी म्हटलं आहे (Brazil nurses find unique way to give human touch to corona patients).

हेही वाचा : पुणेकरांना मोठा दिलासा, 2 दिवसांत कोरोना लसीचे पावणे चार लाख डोस मिळणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें