AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Funny video viral : मांजरीचं ‘हे’ पिल्लू किती खट्याळ असावं? पाहा काय केलं?

Cat cute video : मांजरी दिसण्यात जितक्या गोंडस आहेत तितक्याच त्या खोडकरही असतात. त्यांचे मजेदार व्हिडिओ (Funny) सोशल मीडियावर (Social media) सर्वाधिक व्हायरल (Viral) होतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला खूप हसू येईल.

Funny video viral : मांजरीचं 'हे' पिल्लू किती खट्याळ असावं? पाहा काय केलं?
कुतूहलाने वस्तूशी खेळणारं मांजरीचं पिल्लू
| Updated on: Feb 23, 2022 | 5:43 PM
Share

Cat cute video : तुमच्या घरात लहान मुलं असतील तर ते किती खट्याळपणा करतात हे तुम्हाला चांगलेच कळेल. दिवसभर ते खेळण्यात मग्न असतात आणि घरात काही ना काही करत राहतात. या लहान मुलांच्या गोष्टी झाल्या. परंतु प्राणीही याबाबतीत कमी नाहीत. आजकाल मोठ्या संख्येने लोक कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळतात. ते आपल्या मुलांना जेवढे प्रेम देतात तेवढेच प्रेमही त्यांना देऊ लागले आहेत. यामुळेच हे प्राणीही त्यांच्यात जरा जास्तच मिसळतात. विशेषतः जर आपण मांजरींबद्दल बोललो तर त्या दिसण्यात जितक्या गोंडस आहेत तितक्याच त्या खोडकरही असतात. त्यांचे मजेदार, गोंडस (Funny) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) सर्वाधिक व्हायरल (Viral) होतात. लोकांना ते आवडतात. त्यामुळे ते लोकप्रिय होतात. घरात त्या काही ना काही करत राहतात. असाच एक मांजरीचा व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला खूप हसू येईल.

कुतुहलाने गोल गोल फिरवलं

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती सोफ्यावर बसली आहे आणि तिच्या पायाजवळ एक गोलाकार वस्तू खाली पडली आहे. आता ती गोष्ट काय आहे हे मांजरीला समजत नाही. म्हणूनच ती कधी त्याच्या आत डोकावते तर कधी तिच्या आत शिरण्याचा प्रयत्न करते. अखेर तिच्या कुतूहलाला उत्तर मिळाल्यावर ती त्या गोल वस्तूच्या आत शिरते आणि तिकडे गोल गोल फिरू लागते. आता याला मस्ती करणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? मुलं जसं कुतूहलातून काहीही विचार न करता खोडकरपणा करतात, तसेच या मांजराच्या बाबतीतही घडतं.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि ‘जिज्ञासेने मांजरीच्या पिल्लाला गोल गोल फिरवले’ असे कॅप्शन लिहिले आहे. अवघ्या 13 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

आणखी वाचा :

Elephant video viral : जंगलातल्या रस्त्यानं जात असताना अचानक समोर आला महाकाय हत्ती आणि…

Video : लग्न आहे की सर्कस? क्वचितच पाहिलं असेल ‘असं’ भन्नाट Pre Wedding Photoshoot!

गाणं तर हिट झालं आता नृत्यही! Kacha badam गाण्यावर Bhuban Badyakarचा Dance video viral

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.