AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाणं तर हिट झालं आता नृत्यही! Kacha badam गाण्यावर Bhuban Badyakarचा Dance video viral

Actor Neel Bhattacharya post : अभिनेता नील भट्टाचार्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ (Video) शेअर केला आहे, ज्यामध्ये भुबन बद्याकर (Bhuban Badyakar) त्याच्या स्वत:च्या कच्चा बदाम (Kacha badam) गाण्यावर डान्स करत आहे.

गाणं तर हिट झालं आता नृत्यही! Kacha badam गाण्यावर Bhuban Badyakarचा Dance video viral
कच्चा बदाम गाण्यावर डान्स करताना भुबन बद्याकर
| Updated on: Feb 23, 2022 | 12:56 PM
Share

Actor Neel Bhattacharya post : श्रीलंकन ​​हिट गाणे मनिके मागे हितेप्रमाणेच बंगाली गाणे कच्चा बदाम हे गाणेदेखील गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकळ घातल आहे. या गाण्याचे बोल लोकांच्या डोक्यावर इतके उंच भरारी घेत आहेत की प्रत्येकजण त्यावर इन्स्टाग्राम रील बनवत आहे. कच्चा बदाम हे गाणे कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने गायले नसून पश्चिम बंगालच्या रस्त्यावर एका गाडीवर वस्तू विक्रेता भुबन बद्याकर याने गायले होते. मात्र, आता तो स्टार झाला आहे. अलीकडेच बंगाली टीव्ही अभिनेता नील भट्टाचार्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ (Video) शेअर केला आहे, ज्यामध्ये भुबन बद्याकर (Bhuban Badyakar) त्याच्या स्वत:च्या कच्चा बदाम (Kacha badam) गाण्यावर डान्स करत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भुबन काही लोकांसोबत त्याच्याच कच्चा बदम या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

‘भेटून खूप आनंद झाला’

हा व्हिडिओ आतापर्यंत 9 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. सोशल मीडियाच्या लोकांनाही हा व्हिडीओ चांगलाच आवडत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना बंगाली टीव्ही अभिनेता नील भट्टाचार्यने कॅप्शनमध्ये लिहिले, कीज्या व्यक्तीने कच्चा बदाम गाणे गायले आहे. त्यांना भेटून खूप आनंद झाला. यासोबतच अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना भुबन बद्याकरला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले आहे.

अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांनी केले भुबनचे कौतुक

18 फेब्रुवारी रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 32 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरने लिहिले आहे, ‘ओह हो…बादाम अंकल के साथ.’ त्याचप्रमाणे अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांनी भुबनचे कौतुक केले. त्याच्या व्हिडिओचे खूप कौतुक झाले आहे. ‘कच्चा बदाम’ या गाण्याने रातोरात लोकप्रिय झालेल्या भुबन बद्याकरची शैली पूर्णपणे बदलली आहे. ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. याआधी भुबन त्याच्या गाण्याच्या हरयाणवी रिमिक्समध्ये दिसला होता. ज्याला भुबनसह रॅपर आणि गायक अमित धुल यांनी बनवले आहे.

आणखी वाचा :

Dancing traffic lights स्वत:च सांगत आहेत ‘आता पुढे जायचं नाही!’ Funny video viral

Anand Mahindra tweet : बैलांच्या कळपावर ‘हा’ एकटा बदक भारी! पाहा, Ultra high josh..!

उणे 30 अंश तापमानात ITBP Commandantचे न थकता पुशअप्स, पाहा Viral video

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.