AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cat cute video : साधंसुधं नाही, सुरातलं मॅव मॅव आहे हे..! मांजरीचं असं smart singing चुकवू नका!

Animals cute video : एका मांजरीचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल (Viral) होत आहे. मांजरीला असे गाताना (Singing) तुम्ही क्वचितच ऐकले असेल. या व्हिडिओने सोशल मीडियावर (Social Media) धुराळा उडवला आहे. एक माणूस गिटार वाजवत आहे आणि बाजुच्या मांजरीसमोर माइक आहे.

Cat cute video : साधंसुधं नाही, सुरातलं मॅव मॅव आहे हे..! मांजरीचं असं smart singing चुकवू नका!
गिटारला साथ देत सुरात गाताना मांजर
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 21, 2022 | 11:59 AM
Share

Animals cute video : सोशल मीडियावर अनेकदा विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यात काही हसवतात आणि गुदगुल्या करतात तर काही आश्चर्यचकित होतात. विशेषत: प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर भरलेले आहेत. प्राण्यांच्या धावत-पळण्याचे व्हिडिओ तुम्ही खूप पाहिले असतील, पण तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला गाताना किंवा सांगताना पाहिले आहे का? 2020मध्ये एका कुत्र्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो रानू मंडलचे ‘तेरी मेरी कहानी’ गाताना दिसत होता आणि आता एका मांजरीचा गोड (Cute) व्हिडिओ सध्या खूप व्हायरल (Viral) होत आहे. मांजरीला असे गाताना (Singing) तुम्ही क्वचितच ऐकले असेल. या व्हिडिओने सोशल मीडियावर (Social Media) धुराळा उडवला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माणूस गिटार वाजवत आहे आणि बाजुला बसलेल्या मांजरीसमोर माइक आहे.

ट्विटरवर शेअर

मांजर त्या माणसाच्या गिटारवर गात आहे. ती वेळोवेळी इतकी सुंदर म्याऊ करते की ऐकून वेगळाच फील येतो. गिटार वाजवताना माणूस थांबतो आणि मांजरीकडे पाहताच मांजर एक सुंदर म्याव करते. हा व्हिडिओ पाहून संगीतकार आणि गायक यांच्यात स्पर्धा सुरू असल्याचे दिसते. हा मजेदार व्हिडिओ @buitengebieden_ या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 25 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 28 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 15 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

‘मांजर हुशार’

व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने ही मांजर हुशार असल्याचे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूझरने ‘मांजरींना संगीताची उत्तम जाण असते, तर कुत्र्यांना स्पष्टपणे नसते, अशी टिप्पणी केली आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक यूझर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या फनी कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा :

Viral : …अन् बिबट्यानं भल्या मोठ्या अजगराची केली शिकार, पाहा थरारक Video

Viral Video : …म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना ‘या’ काकांनी दाखवला योग्य रस्ता

‘कोरोनानं लावलं जगाला वेड, त्याची सर्वांना लागण.. या सुरक्षेनं लावला वेळ, झालंबाबा एकदाचं लगन’, यासह ऐका भन्नाट Ukhane

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल