AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : …म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना ‘या’ काकांनी दाखवला योग्य रस्ता

Child short story video : सोशल मीडियावर (Social Media) लहान मुलांचे अनेक व्हिडिओ (Video) आपण पाहत असतो. आता त्याच प्रकारात एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल (Viral) होतोय, ते म्हणजे कोणतंही चुकीचं काम करू नये, असा संदेश (Message) देणारा व्हिडिओ.

Viral Video : ...म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना 'या' काकांनी दाखवला योग्य रस्ता
चुकीचं काम करणाऱ्यांना समजावून सांगताना एक व्यक्ती
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 20, 2022 | 8:30 AM
Share

Child short story video : लहान मुलं ही मातीचा गोळा असतात. जसा आकार देणार तशी ती घडतात, असं म्हटलं जातं. लहानपणीच आपण मुलांवर संस्कार केले तर पुढं जाऊन ते देशाचे एक चांगले आणि जबाबदार नागरिक बनतील अन्यथा मग लोकांना बनवत राहतील. म्हणजेच संस्काराअभावी लोकांना टोप्या घालायचं काम करतील. त्यामुळे आपण लहान मुलांना घडवताना चांगल्या गोष्टी त्यांना शिकवाव्यात, म्हणजे ते चुकीचं असं कोणतंही काम करणार नाहीत. सोशल मीडियावर (Social Media) लहान मुलांचे अनेक व्हिडिओ (Video) आपण पाहत असतो. आता त्याच प्रकारात एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल (Viral) होतोय, ते म्हणजे कोणतंही चुकीचं काम करू नये, असा संदेश (Message) देणारा व्हिडिओ. यूझर्सना हा व्हिडिओ आवडलाय. मुलांना शिकवण देणारा असा हा व्हिडिओ आहे.

पैसे उकळण्यास सांगतो

व्हिडिओचं लोकेशन एका बर्फाळ प्रदेशातलं दिसतं. दोन लहान मुले आणि एक तरूण त्यात दिसतोय. तो मुलांना सांगतो, की हा फोन घ्या आणि याच्या जाळ्यात बकरे अडकवा. म्हणजेच पर्यटकांकडून पैसे घ्या. मग ती दोन मुलं एका परिवारास भेटतात. त्यांना याचना करतात, की आम्ही आमच्या आई-वडिलांपासून हरवलो आहोत. आमच्याकडे फोनही नाही आणि पैसेही नाहीत. सकाळपासून काही खाल्लही नाही. पण ते काका त्यांच्यावर ओरडतात आणि म्हणतात, की चांगल्या घरचे वाटता आणि तरीही पैसे मागता? मग त्या काकांची पत्नी त्यांना समजावते आणि मग ते त्यांना पैसे देतात. मात्र त्यादरम्यान त्यांच्याजवळचा मोबाइल खाली पडतो. ते काका तो मोबाइल पाहतात. नंतर काय होतं, यासाठी हा व्हिडिओ पाहावाच.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर जॉमी प्रॉडक्शन (Jomy Production) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 16 फेब्रुवारीला अपलोड या व्हिडिओला 3.4 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून यात वाढच होत आहे. ‘Galat Kaam Nahi Karne Chahiye‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला असून यातून एक संदेश देण्यात आलाय, जो सर्वांनाच भावलाय. (Video courtesy – Jomy Production)

आणखी वाचा :

Video viral : ‘याच्या’ हौसेला मोलच नाही! 1-1 रुपया जमवत अखेर खरेदी केली आपल्या स्वप्नातली स्कूटर

अरे, आपल्याला खेळायचंय; शिकार नाही करायची! असं तर ‘ही’ मांजर म्हणत नसेल ना! Funny video viral

दोन हातांनी Tractor उचलतोय हा मुलगा, खरं नाही वाटत! Viral video पाहा आणि तुम्हीच ठरवा

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल