ही चिमुकली बघा, हिचा डान्स बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

सहसा लहान मुलांना नीट चालायलाही येत नाही, त्यामुळे नाचणं तर सोडाच, पण ही मुलगी जणू नृत्यात पारंगत असल्यासारखं नाचताना दिसते. हा डान्स व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे.

ही चिमुकली बघा, हिचा डान्स बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!
Balam Thanedar Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 28, 2023 | 5:27 PM

आजकाल लहान मुलेही सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत. कधी ते आपल्या गायनाची जादू दाखवत असतात, तर कधी आपल्या नृत्याने लोकांना चकित करत असतात. त्याचबरोबर काही मुले ही आपल्या अभिनयाने लोकांना मंत्रमुग्ध करताना दिसतात. सध्या अशाच एका छोट्या मुलीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती जबरदस्त डान्स करताना आणि आपल्या एक्सप्रेशनने लोकांची मने जिंकताना दिसत आहे.

सहसा लहान मुलांना नीट चालायलाही येत नाही, त्यामुळे नाचणं तर सोडाच, पण ही मुलगी जणू नृत्यात पारंगत असल्यासारखं नाचताना दिसते. हा डान्स व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी कशा प्रकारे हावभाव करत आहे, आपली कंबर हलवत आहे. बॅकग्राऊंडमध्ये हरियाणवी गाणं ‘बालन थानादार चालवे जिप्सी’ वाजत आहे आणि ती मुलगी अतिशय अप्रतिम अंदाजात त्यावर आपली कंबर हलवत आहे. जणू काही तिला या वयात गाण्याचा अर्थच समजलाय. त्यानुसार ती गाण्यावर नाचत आहे.

गाण्यावर डान्स करताना ती लिपसिंकिंग करत आहे आणि तिला हवे तसे एक्सप्रेशनही देत आहे.

आता या मुलीचा व्हिडीओ लोकांना आवडणार नाही असं कसं होऊ शकतं. तिचा डान्स पाहून मोठमोठ्या डान्सर्सनीही कौतुक करायला सुरुवात केली. दिशू असे या मुलीचे नाव सांगितले जात आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर aapkidishu_ नावाच्या आयडीसह मुलीचा हा शानदार डान्स व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 2.7 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. तर 27 लाख 1 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे.