AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिमुसळधार पावसाचा इशारा, थेट अलर्ट, महाराष्ट्रात आज..

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. काही राज्यांमुळे भारतीय हवामान विभागाने थेट अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

अतिमुसळधार पावसाचा इशारा, थेट अलर्ट, महाराष्ट्रात आज..
Rain
| Updated on: Feb 09, 2026 | 8:19 AM
Share

राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात पाऊस तर उकाडा बघायला मिळत आहे. राज्यातून थंडी जवळपास गायब झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून वातावरणात चढउतार बघायला मिळत आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारच्यावेळी उकाडा असेल. दुपारच्यावेळी 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. यासोबतच अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. यासोबतच उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी कायम असेल.

मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा वाईट श्रेणीत पोहोचलाय. हवा पुन्हा दुषित झालीये. दृष्यमानतेवर परिणाम स्पष्ट दिसून येतोय. आज मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 204 वर पोहोचलाय. पीएम 10 चं प्रमाण 180 वर तर पीएम 2.5 चं प्रमाण 151 वर गेलेय. आगामी 48 तासांत किमान तापमानात 2-3 अंशांची घट होणार असल्याने राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत सकाळी धुरकट वातावरण तर दुपारी आकाश निरभ्र असेल. कमाल तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याने उन्हाचा चटकाही जाणवणार आहे. राज्याच्या हवामानात सध्या मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात संमिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे. काही भागांत थंडीची लाट येण्याचे संकेत आहेत.

तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढू शकतो. पुढील 48 तासांत हे हवामान पुन्हा बदलण्याचे संकेत आहेत. दरम्यान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारमध्ये तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान होते. यासोबतच मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला. देशात काही भागात मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी तर काही भागात थेट उकाडा जाणवत आहे. सतत हवामानात बदल होताना दिसत असून याचा परिणाम थेट आरोग्यावर होताना दिसत आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?