AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: मुलाचं मुंडन आणि आई ढसाढसा रडली, भावूक झालेला आईचा व्हिडीओ 4 कोटी लोकांनी पाहिला!

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. ऐश्वर्या कौशिक सेठच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. त्यांनी हा व्हिडिओ मे महिन्यात अपलोड केला होता, जेव्हा त्यांच्या मुलाचा मुंडण समारंभ होता.

Video: मुलाचं मुंडन आणि आई ढसाढसा रडली, भावूक झालेला आईचा व्हिडीओ 4 कोटी लोकांनी पाहिला!
मुलाचं मुंडण सुरु असताना रडणारी आई
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 11:36 AM
Share

सोशल मीडियावर काही मजेशीर आणि भावनिक व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात. मुंडण समारंभाशी संबंधित अनेक व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिले असतील, ज्यामध्ये लहान मूल अनेकदा रडताना दिसले असेल, परंतु आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला व्हिडिओ उलटा आहे, ज्यामध्ये एका लहान मुलाचे मुंडन केले जात आहे. पण व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे त्या मुलाची आई. जेव्हा मुलाचे मुंडण केले जाते, तेव्हाच त्याची आई त्याच्या शेजारी बसलेली असते, मग काही वेळाने त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यावर लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. (Desi mother gets emotional as son head is shaved called mundan ceremony Viral video)

हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. ऐश्वर्या कौशिक सेठच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. त्यांनी हा व्हिडिओ मे महिन्यात अपलोड केला होता, जेव्हा त्यांच्या मुलाचा मुंडण समारंभ होता. जुन्या हिंदू परंपरेनुसार आपल्या मुलाचे मुंडण करताना पाहणे हा त्यांच्यासाठी हृदयद्रावक क्षण होता. व्हिडीओ कंटेंट क्रिएटर असलेल्या ऐश्वर्याने ही क्लिप इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे आणि ती आतापर्यंत 43 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. यासोबतच व्हिडिओवर 2.7 मिलियन्स लाईक्सही पाहायला मिळत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा-

मुंडन समारंभ हा एका महत्त्वाच्या हिंदू परंपरेचा भाग आहे, जिथं जन्मानंतर प्रथमच मुलाचे डोके मुंडन केले जातं. ज्याला आपल्याकडे जावळ काढणं असंही म्हणतात. या कामासाठी एका सलून व्यावसायिकाकडे मुलाचे मुंडण करण्याचे काम सोपवले जाते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याचे मूल मोबाईलवर बसून कार्टून बघताना दिसत आहे. मात्र, त्याची आई अश्रू ढाळताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा माझा हेअरकट खराब होतो, तेव्हाही इतकं दु:ख झालं नाही.’

या व्हिडिओवर हजारो कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘यामध्ये भावनिक होण्यात काही अर्थ नव्हता, तुम्ही लहान असताना तुमचंही मुंडणही केलं असेल’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘आई प्रत्येक गोष्टीवर भावूक होत असते’. अजून एकाने लिहिलं, ‘दोन्ही तू खरोखरच गोंडस आहेस

हेही पाहा:

तिरुमला तिरुपतीत वरुणराजाचा रुद्रावतार, सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओंचा पूर, पाहा भयानक दृश्यं

Viral Video: पायाने कार पार्क करणारी ‘वंडर वूमन’, लोक म्हणाले, ही आयडीया कार बनवणाऱ्यांनाही आली नसेल

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....