AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिरुमला तिरुपतीत वरुणराजाचा रुद्रावतार, सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओंचा पूर, पाहा भयानक दृश्यं

मुसळधार पावसामुळे गुरुवारी सायंकाळपासून तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या प्राचीन मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला होता. अनेक भागात पाणी साचले आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहात अनेक गाड्याही वाहून गेल्याची स्थिती आहे.

तिरुमला तिरुपतीत वरुणराजाचा रुद्रावतार, सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडीओंचा पूर, पाहा भयानक दृश्यं
तिरुमला तिरुपतीत महापूर
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 11:12 AM
Share

गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आंध्र प्रदेशातील किनारी भागात पुराने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे तिरुपती मंदिरात रस्त्यांवर पाणी साचल्याने शेकडो यात्रेकरू अडकून पडलेले दिसले. तिरुपती शहरातील काही भागात रस्ते आणि लोकांची घरेही जलमय झाली आहेत.भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, कमी दाबाचे क्षेत्र चेन्नई आणि पुद्दुचेरी दरम्यानच्या किनारपट्टीला ओलांडले आहे. ( Flooded Conditions on Tirupati balaji temple heavy rain flash flood users share video on social media)

राज्यातील मुसळधार पावसामुळे तिरुपती मंदिरात शेकडो यात्रेकरू अडकून पडलेले दिसले. मात्र, त्याची सुटका करून तिथून बाहेर काढण्यात आले. मुसळधार पावसामुळे गुरुवारी सायंकाळपासून तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या प्राचीन मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला होता. अनेक भागात पाणी साचले आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहात अनेक गाड्याही वाहून गेल्याची स्थिती आहे. तिथले दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. येथे, #तिरुपतीपाऊस आणि #tirupatifloods सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.

व्हिडिओ पाहा:

काही युजर्स सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. तर काहींचे म्हणणे आहे की परिस्थिती खूपच भयावह दिसत आहे. एका यूजरने लिहिले की, “आंध्र प्रदेशातील हा विध्वंस पाहून हृदय थरथरते. आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारने शक्य तेवढे प्रयत्न करावेत. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘तिरुपतीहून हृदयद्रावक माहिती येत आहे, जिथं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे, संबंधित कुटुंबांप्रती माझा मनापासून संवेदना आहे, तसेच संरक्षणासाठी देवाला प्रार्थना करतो.

हेही पाहा:

Video: ‘माणिके मागे हिते’चं सॅक्सोफोन व्हर्जन ऐकून नेटकरी तृप्त, कलाकाराचं तोंडभरुन कौतुक!

Video: ‘सजना है मुझे, सजना के लिए’वर दादीचा भन्नाट डान्स, बोटांची कलाकारी नेटकऱ्यांना आवडली!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.