देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं,”काय बोलत असतील बरं PM-CM?” मग काय लोकांनी मारले तुक्के

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मेट्रोतून प्रवास केला. तिघेही एकत्र बसले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी विचारलं,काय बोलत असतील बरं PM-CM? मग काय लोकांनी मारले तुक्के
PM narendra modi, CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadanvis
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 20, 2023 | 3:10 PM

मुंबई: सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे जिथे लोक कोणालाही सोडत नाहीत. मुख्यमंत्री असो वा पंतप्रधान, इथे युजर्स सगळ्यांना ट्रोल करतात. सध्या पंतप्रधान मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला लोक भरपूर ट्रोल करत आहेत आणि त्याची मजा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत नव्या मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मेट्रोतून प्रवास केला. तिघेही एकत्र बसले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भातील एक फोटो शेअर केला असून या तिघांमध्ये काय चालले आहे याचा अंदाज घेण्यास सांगितले आहे.

मेट्रोतून प्रवास करताना हे तिन्ही दिग्गज नेते एकमेकांशी हसत हसत कसे बोलत आहेत, हे या फोटोत तुम्ही पाहू शकता. देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘संभाषणाचा अंदाज घ्या’.

या कॅप्शननंतर त्याने हसण्याचा इमोजीही शेअर केला आहे. फडणवीसांना फक्त एवढंच लिहिलं आणि मग काय सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सूरच लावायला सुरुवात केली.

कुणी ‘देशाचं आणि राज्याचं भवितव्य सुरक्षित आणि उज्ज्वल आणि अपेक्षांनी भरलेलं आहे!’, असं हे तिन्ही नेते बोलत आहेत, तर कुणी मजेशीर पद्धतीने लिहिलं आहे की, ‘ही आमच्यासारखी देवेंद्र भाऊंची दाढी नाही’, असं पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे बोलत आहेत.

मेट्रोच्या प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींनी प्रवाशांसह मेट्रो कर्मचारी आणि महिलांशी संवाद साधला.