diljit dosanjh Video : दिलजीत दोसांझची प्रचंड क्रेझ , कॉन्सर्टमध्ये पाणी विकून पठ्ठ्याने 2 तासांत कमावला इतका पैसा

गर्दीचा फायदा प्रत्येक जण घेतात. कोणी चोरी करून पैसे कमावतं. तर कोणी बुद्धी लढवून,प्रसिद्ध सिंगर दिलजीत दोसांझ याच्या कॉन्सर्टमध्ये तरूणाने असं काही केलंय, की तो चक्क मालामाल झालाय. त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

diljit dosanjh Video : दिलजीत दोसांझची प्रचंड क्रेझ ,  कॉन्सर्टमध्ये पाणी विकून पठ्ठ्याने  2 तासांत कमावला इतका पैसा
diljit dosanjh concert viral video
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 02, 2026 | 2:17 PM

गाण्यांच्या कॉन्सर्टमध्ये तरूणाईची प्रचंड गर्दी असते. कॉन्सर्टमध्ये जायचं म्हटल्यावर पोरं पोरी एकदम टिप टॉप तयार होऊन येतात. आता वनपीस घातल्यावर कोणीही जास्त काही घेऊन येत नाही.गाण्यांचा कॉन्सर्ट म्हटल्यावर ओरडणं, मोठ्याने गाणी गाण आलंच, त्यामुळे साहजिकच तहान तर लागणारचं त्यात ही वाढती गरमी आहेच. याच जमलेल्या गर्दीचा फायदा घेत एका तरूणाने पाण्याच्या बॉटल्स विकल्या आणि तु्म्हाला विश्वास बसणार नाही की या पठ्ठ्याने फक्त दोन तासात इतके पैसे कमावले आहेत जो काहींचा महिन्याचा पगार असतो.

दिलजीच दोसांझचा ‘ऑरा इंडिया टूर 2026’ मधील दिल्लीतील कार्यक्रम 30 ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने चाहते आले होते.याच गर्दिचा फायदा घेत एका तरूणाने स्टेडियमबाहेर पाण्याच्या बाटल्या विकण्यास सुरूवात केली.

Loading...

एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये हा तरूण आपल्या कमाईचा आकडा सांगताना दिसतो. त्याच्या म्हणण्यांनुसार त्याने दोन तासांत 40 पॅकेट विकले. एका पॅकेटमध्ये 12 बाटल्या होत्या. म्हणजेच त्याने एकूण 480 बाटल्या विकल्या. प्रत्येक बाटली 50 रूपयांना विकल्यामुळे त्याची एकूण विक्री 2 तासांत चक्क 24 हजार झाली.

 

सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर तरूणाच्या कमाईची चर्चा रंगली. काही नेटकऱ्यांनी 24,000 हा मेन नफा नाही अशी टिका केली आहे, तर काहींनी त्या मुलाच्या कल्पनेचे कौतुक केले आहे. तर काही यूजर्सनी पाण्याच्या बाटलीची किंमत खूप जास्त असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने तर चक्क असे 4-5 कॉन्सर्ट केले तर लखपती होईल असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजर्सने महिन्याची कमाई पठ्ठ्याने 2 तासांत केली यांच कौतुक केल आहे. काहींनी मात्र आक्षेप घेत MRP पेक्षा जास्त दराने पाणी विकलं जात असेल तर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us