AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Saraf : तिची आणि माझी जोडी…सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केलेल्या भावना, काय म्हणालेले?

Ashok Saraf On Marathi Actress : अशोक सराफ यांनी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं कौतुक करत तिच्याबद्दल भावना व्यक्त केलेल्या.

Ashok Saraf : तिची आणि माझी जोडी...सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केलेल्या भावना, काय म्हणालेले?
| Updated on: Nov 02, 2026 | 2:19 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकप्रिय अभिनेत्रींसोबत काम केलं. मात्र, त्यांच्यासोबत पडद्यावर सर्वाधिक चित्रपट केलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख. या दोघांची जोडी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीत विशेष गाजली होती. आजही त्यांच्या चित्रपटांतील प्रसंग आणि अभिनय प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अशातच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी रंजना यांच्याबद्दल भाष्य केलेलं.

काय म्हणाले होते अशोक सराफ?

अशोक सराफ यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र, अभिनेत्री म्हणून त्यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांमध्ये रंजना यांचे नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. ‘रेडिओ सिटी‘ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांना ‘तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणती?’ असं विचारण्यात आलेलं. त्यावर अशोक सराफ म्हणाले की, ‘खरं सांगायचं तर माझी चांगली जोडी जमली ती रंजना बरोबर. एक फाईन आर्टिस्ट, नो डाऊट, मेनू टू आर्टिस्ट. आपल्याला एखादी गोष्ट जमत कशी नाही, हे तिचं असायचं. जमत कशी नाही? मी करणार, असा ध्यास होता तिच्यात.’

‘एवढा जेव्हा ध्यास असतो ना तेव्हाच तुम्ही यशस्वी होता आणि म्हणून ती यशस्वी झाली. नाहीतर तिनं सुरुवातीला केलेलं सिनेमे मी पाहिलेत. का केले होते असे सिनेमे? पण नंतर-नंतर तिनं इतकं डेव्हलप केलं आणि नंतर इंडस्ट्रीमध्ये तिचे आणि माझे इतके सिनेमे झाले. त्यामुळे तिची आणि माझी जोडी जमली होती.’ असं अशोक सराफ म्हणाले होते.

अशोक सराफ आणि रंजना यांची जोडी विशेष गाजलेल्या चित्रपटांपैकी ‘बिनकामाचा नवरा’ आणि ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटांचा उल्लेख आवर्जून केला जातो. या चित्रपटांमधून दोघांच्या अभिनयाची वेगळीच जादू पाहायला मिळाली.

दरम्यान, रंजना देशमुख यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या अभिनयातील उत्स्फूर्तता आणि व्यक्तिमत्त्वामुळे त्या प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्री बनल्या. मात्र, त्यांच्या आयुष्यात आलेल्या दुर्दैवी प्रसंगांमुळे त्यांच्या कारकिर्दीला मोठा फटका बसला. आज रंजना या आपल्यात नसल्या, तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. अशोक सराफ यांच्यासोबतची त्यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय जोड्यांपैकी एक मानली जाते.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चां
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चांना उधाण
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?
दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची शक्यता, दिया मिर्झा..
Mumbai BMC : दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची ठिणगी
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ...
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणादरम्यान काय घडलं?
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट..
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत, आरोग्याला मोठा धोका
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय..
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय राऊतांचं विधान
मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या राज्यांना ...
Weather Alert: मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या 3 राज्यांना तातडीने अलर्ट जारी