AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चन पांडेचं ‘मार खाएगा’ पाहा Dwayne Bravo स्टाइलमध्ये! Social mediaवर ‘या’ Videoचा धुमाकूळ…

Bachchan Pandey fever on Dwayne Bravo : पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने 'मार खाएगा' (Mar Khayega) गाण्यावर दमदार डान्स (Dance) मूव्ह दाखवून लोकांची मने जिंकली. आता वेस्ट इंडिजचा (West Indies) खेळाडू ड्वेन ब्राव्होनेही या ट्रेंडमध्ये उडी घेतली आहे.

बच्चन पांडेचं 'मार खाएगा' पाहा Dwayne Bravo स्टाइलमध्ये! Social mediaवर 'या' Videoचा धुमाकूळ...
बच्चन पांडे सिनेमातल्या गाण्यावर डान्स आणि लिप-सिंक करताना ड्वेन ब्राव्होImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 03, 2022 | 10:32 AM
Share

Bachchan Pandey fever on Dwayne Bravo : अल्लू अर्जुन स्टारर तेलुग चित्रपट पुष्पाचा फिव्हर क्रिकेटर्सवर कमी होत नाही तर आता अक्षय कुमार आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट ‘बच्चन पांडे‘ सिनेमाचा फिव्हर चढायला लागला आहे. पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने ‘मार खाएगा’ (Mar Khayega) गाण्यावर दमदार डान्स (Dance) मूव्ह दाखवून लोकांची मने जिंकली. आता वेस्ट इंडिजचा (West Indies) खेळाडू ड्वेन ब्राव्होनेही या ट्रेंडमध्ये उडी घेतली आहे. या गाण्यावर त्याने एक इन्स्टाग्राम रील बनवली असून सोशल मीडियावर धुरळाच उडवून दिलाय. लोकांना ब्राव्होची नवीन स्टाइल खूप आवडली आहे. विशेषत: भारतीय चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, की कॅरेबियन क्रिकेटर ड्वेन ब्राव्होने ‘बच्चन पांडे’, ‘मार खाएगा’च्या शीर्षक गीतावर जबरदस्त डान्स करताना एक अप्रतिम लिप-सिंक केला आहे. ही अॅक्टिंग त्याने अतिशय गांभीर्याने आणि चोख बजावली आहे.

इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर

ब्राव्होला पाहून बच्चन पांडेची क्रेझ किती आहे, याचा अंदाज येतो. भारतीय चित्रपटसृष्टीचा हा प्रभाव एका परदेशी व्यक्तीवर पाहणे आनंददायी आहे. ब्राव्होचे भारतातही चांगले फॅन फॉलोइंग आहे. अशा परिस्थितीत लोक त्याचा हा व्हिडिओ खूपच आवडीने पाहत आहेत. क्रिकेटर ड्वेन ब्राव्होने स्वतः त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला 1 लाख 14 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

‘सुपर चॅम्पियन’

एका यूजरने म्हटले, की भाई बच्चन झाला आहे. त्याचवेळी दुसरा यूझर म्हणतो, की आपण सुपर चॅम्पियन आहात. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने झक्कास असे लिहिले आहे. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरचा व्हिडिओ पाहा, ज्यामध्ये त्याने अक्षय कुमारच्या मार खाएगा गाण्याचे हुक स्टेप केल्या.

सोशल मीडियावर चर्चेत

अक्षय कुमार आणि क्रिती सेनन स्टारर ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे शीर्षक गीत लाँच झाल्यापासून ते सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या ‘मार खायेगा’ गाण्यावर प्रत्येकजण इन्स्टाग्रामवर रील बनवत आहे.

आणखी वाचा :

अभ्यासात मन नाही लागत, काय करू? विचारणाऱ्याला शाहरुख खानचं भन्नाट उत्तर

शाहिद कपूरच्या बहिणीचा लग्नसोहळा; महाबळेश्वरमध्ये ‘या’ स्टारकिडशी बांधली लग्नगाठ

‘फ्लॉप शो’चे हिट जसपाल, भल्यांची बोलती बंद करणारा शो 10 एपिसोडमध्ये बंद, वाचा इंटरेस्टिंग कहानी…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.