‘फ्लॉप शो’चे हिट जसपाल, भल्यांची बोलती बंद करणारा शो 10 एपिसोडमध्ये बंद, वाचा इंटरेस्टिंग कहानी…

अभिनेते जसपाल भट्टी यांनी दूरदर्शनवर 'फ्लॉप शो' नावाचा कार्यक्रम आला होता. या कार्यक्रमाचं नाव जरी 'फ्लॉप शो' असलं तरी हा शो प्रेक्षकांची पहिली पसंतीस उतरला. पण पुढे केवळ 10 एपिसोडमध्ये तो बंद झाला.

'फ्लॉप शो'चे हिट जसपाल, भल्यांची बोलती बंद करणारा शो 10 एपिसोडमध्ये बंद, वाचा इंटरेस्टिंग कहानी...
अभिनेते जसपाल भट्टी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Mar 03, 2022 | 7:40 AM

मुंबई : अभिनेते जसपाल भट्टी (Jaspal Bhatti ) टीव्हीला जगतातील एक मोठं नाव. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या काळात त्यांनी लोकांना हसवण्याचा विडा उचलला आणि तो सत्यात उतरवला. 90 च्या दशकात ना केबल टीव्ही होते ना डिश… तेव्हा फक्त दूरदर्शन आणि डीडी मेट्रो या दोनच सरकारी वाहिन्या होत्या. टीव्हीचं सारं जग या दोन वाहिन्यांभोवती फिरत होतं. त्याच काळात जसपाल भट्टी यांनी दूरदर्शनवर ‘फ्लॉप शो’ नावाचा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचं नाव जरी ‘फ्लॉप शो’ असलं तरी हा शो प्रेक्षकांची पहिली पसंतीस उतरला. पण पुढे केवळ 10 एपिसोडमध्ये तो बंद झाला. पण या कार्यक्रमात जसपाल यांनी त्यांच्या कामाची छाप सोडली.

10 एपिसोडनंतर कार्यक्रम बंद

जसपाल भट्टी हे स्वतः दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘फ्लॉप शो’चे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. या शोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक भागाची कथा वेगळी होती. या शोमध्ये राजकारण, समाज आणि व्यवस्थेतील दोषांवर टोमणे मारण्यात यायचे. हा शो त्या काळात खूप लोकप्रिय झाला पण या शोबद्दल दूरदर्शन आणि जसपाल भाटी यांच्यात काही मतभेद झाल्यानंतर अवघ्या 10 एपिसोडनंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला.

जसपाल भट्टी यांनी अभिनेत्री सविता यांच्यासोबत 1985मध्ये लग्न केलं. सविता आणि जसपाल भट्टी यांनी एकत्र कामही केलं होतं. ‘फ्लॉप शो’ या कार्यक्रमाला सविता यांनीच प्रोड्यूस केलं होतं.

जसपाल भट्टी यांचा 25 ऑक्टोबर 2012 ला अपघातात मृत्यू झाला. जसपाल यांच्या अभिनयाबाबत आजही बोललं जातं. ‘फ्लॉप शो’ या कार्यक्रमातील आपल्या कामाने त्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलं.

संबंधित बातम्या

शाहरुख..लब्यू भावा…पठान लागंल तवा लागंल पण…किरण मानेंची फेसबुक पुन्हा चर्चेत…

ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचिट? NCBने दिलं स्पष्टीकरण

Jhund: ‘झुंड’मधील ‘लात मार’ गाण्याची झलक; पुन्हा चालणार अजय-अतुलची जादू?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें