आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं, सोनाली कुलकर्णीच्या ण न वर किरण मानेंचा ‘डॅन्स’

अभिनेता किरण माने म्हणजे सोशल मीडियाचा जबरदस्त भान असलेला एक कलाकार. मी जसा आहे तसा स्वीकारा नाही तर तुमचे मार्ग वेगळे माझा मार्ग वेगळा असं म्हणत ते नेहमीच एकाद्या पोस्टमुळे चर्चेत आलेले असतात. यावेळीही त्यांची पोस्ट चर्चेत आली नाही चर्चेत आली ती पोस्टपेक्षा त्यांची कमेंटच. तीही अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवरील.

आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं, सोनाली कुलकर्णीच्या ण न वर किरण मानेंचा 'डॅन्स'
Kiran Mane-sonali kulkarniImage Credit source: facebbok
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 9:02 PM

मुंबईः महाराष्ट्रात मराठी भाषा दिन असला की, अगदी सेलिब्रेटीपासून ते जनमाणसातील सगळ्यांना भाषेचं प्रचंड उधाण येते, त्यातही मराठी सेलिब्रेटी (Marathi celebrities) असले की ते उधाण अधिकच असते. यावर्षीच्या मराठी भाषा गौरव दिनाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) वेगळ्या स्टाईलमध्ये मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा द्यायला गेली आणि ट्रोल झाली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही, तिच्या या शुभेच्छांना मराठी कलाकारांनी आणि यूजर्संनी ज्या पद्धतीने तिला उत्तर द्यायची होती ती दिलीच पण या सगळ्यात मराठी भाषेत आणि अस्सल गावरान म्हणजेच प्रादेशिक बोलीत ज्यांनी प्रतिक्रिया कमेंट दिली त्या अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांची कमेंटच जास्त ट्रोल झाली आणि सोनाली कुलकर्णीला आपली पोस्ट डिलीट करावी लागली.

अभिनेता किरण माने म्हणजे सामाजिक भान ठेवत आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन तो धीरगंभीर गोष्टीवरुन व्यक्त होत असतो. मागील काही दिवसांपूर्वी किरण माने यांना मुलगी झाली हो या कार्यक्रमातून त्यांना डावलण्यात आले होते. त्यावरुनही सोशल मीडियावर त्यांनी माध्यमे आणि मालिका यांच्यावर पोस्ट केल्या होत्या. त्याही आपल्या बोली भाषेत आणि त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतले होते.

यावेळीही अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या पोस्टला त्यांनी कमेंट दिल्यानंतर सोनालीच्या पोस्टपेक्षा किरण माने यांची कमेंटच अधिक व्हायरल झाली. सोनालीने मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना तिने म्हटले की, न आणि ण.. श आणि ष…ळ आणि ड, चांदणी मधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्छा!!!… या तिच्या पोस्टवर अनेकांनी आपापली मतं नोंदवली. तीही सकारात्मक आणि नकारात्मक अशी. मात्र या सगळ्या कमेंटपेक्षा सोशल मीडियावर व्हायरल झाली ती किरण माने या अभिनेत्याची कमेंट.

पोस्टचा खरपूस समाचार

सोनाली कुलकर्णीला किरण माने आणि अगदी मोजक्या भाषेतच कमेंट दिली आहे पण ती अगदी अस्खलित सातारी बोलीत म्हणजेत त्यांच्या साताऱ्यातील प्रादेशिक बोलीत. या कमेंटमध्ये त्यांनी सोनाली कुलकर्णीच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या पोस्टचा खरपूस समाचार घेतला आहे. ग्रामीण भागातील लोकांकडून लाखा लाखाची सुपारी घ्यायची आणि इकडे सोशल मीडियावर येऊन त्यांची टर उडवायची म्हणत त्यांनी अगदी सोनालीच्या चित्रपटांच्या यादीपर्यंत तिचा समाचार घेतला आहे. तेही त्यांच्या त्यांच्या बोलीत.

किरण माने यांची सोनाली कुलकर्णीच्या पोस्टवरची कमेंट

“‘उच्चार चुकवणार यांनी ‘डॅन्स’ची एक लाखाची सुपारी दिली की पारावर आणि ट्रालिवरबी नाचायचं… आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं. अस्सल सातारीत बोलनार या कायमनला न म्हन्नार या आमच्या लाडक्या राज्यांच्या वाढदिवसाला परवा परवाच साताऱ्यात नाचून गेल्यात म्याडम…या नाट्यांना प्रमाणभाषेत बोलनारं कुत्रंबी ईचारत नाय. सगळं यश मिळवलंय ते ग्रामीन भूमिका करूनच. लिश्ट काढा हिट पिच्चरची.’” संबंधित बातम्या

शाहरुख..लब्यू भावा…पठान लागंल तवा लागंल पण…किरण मानेंची फेसबुक पुन्हा चर्चेत…

ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचिट? NCBने दिलं स्पष्टीकरण

Jhund: ‘झुंड’मधील ‘लात मार’ गाण्याची झलक; पुन्हा चालणार अजय-अतुलची जादू?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.