शाहरुख..लब्यू भावा…पठान लागंल तवा लागंल पण…किरण मानेंची फेसबुक पुन्हा चर्चेत…

आज एका फेसबूक पोस्टने किरण माने हे नाव पुन्हा चर्चेत आलं. कारण त्यांनी एनसीबीविरोधात  (Aryan Khan Drugs Case) अतिशय खरमरीत पोस्ट लिहली आहे. आणि शाहरुखचं समर्थन केले आहे.

शाहरुख..लब्यू भावा...पठान लागंल तवा लागंल पण...किरण मानेंची फेसबुक पुन्हा चर्चेत...
Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 8:41 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता किरण माने हे नाव चांगलच चर्चेत आहे. राज्याच्या राजकारणातही किरण माने यांच्यावरून बराच वाद (Kiran Mane) झाला. याची सुरूवात झाली त्यांना मुलगी झाली (Mulgi Zali Ho) हो, या मालिकेतून काढल्यानंतर. राजकीय भूमिका घेतल्याने मला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला. त्यानंतर महाविकास आघाडी किरण मानेंच्या समर्थनार्थ दिसून आली. किरण माने यांच्यावर अन्याय झालाय.त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना मालिकेत परत घ्यावं. नाहीतर मालिका चालू देणार नाही. असा इशाराही महाविकास आघाडीने दिला. त्यानंतर त्यांवर महिलांशी गैरवर्तन केल्याचे आरोप झाले. काही महिला कलाकार त्यांच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या. त्यानंतर हा वाद काही काळच चालल्यानंतर शांत झाला. मात्र आज एका फेसबूक पोस्टने किरण माने हे नाव पुन्हा चर्चेत आलं. कारण त्यांनी एनसीबीविरोधात  (Aryan Khan Drugs Case) अतिशय खरमरीत पोस्ट लिहली आहे. आणि शाहरुखचं समर्थन केले आहे.

फेसबूक पोस्टची चर्चा

किरण मानेंची फेसबूक पोस्ट काय?

आपल्या शारख्याचा ‘पठान’ पिच्चर लागंल तवा लागंल.. आज मात्र त्यानं व्यवस्थित पXXन लावला. संविधानिक मार्गानं ! एन.सी.बी नं सखोल चौकशी करून आर्यन खानला निर्दोष जाहीर केलेलं हाय. आर्यनकडं कुठलाच अंमली पदार्थ सापडला नाय आनि त्याचा कुठल्याबी आंतरराष्ट्रीय ड्रग गँगशी संबंध असल्याचा पुरावाबी सापडला नाय. …कटकारस्थान्यांनी गळ्यात पट्टा बांधून पाळलेले सरकारी अधिकारी किती भिकारचोXपना करत्यात आनि त्यांची विषारी पिलावळ अशा भुरट्या अधिकार्‍यांना ‘सिंघम’ , ‘सिंघम’ करत कसं डोक्यावर नाचवत्यात याचं ढळढळीत उदाहरन हाय हे ! ‘बदनामी’ हे या पाताळयंत्री बांडगुळांचं मुख्य जाळं हाय भावांनो… समजून घ्या. हज्जारो वर्षांपास्नं विरोधकांना या जाळ्यातच अडकवत आलेत हे. ‘आमचा विरोध कराल तर बदनाम करू.’ असा संदेश द्यायचा असतो यांना. त्या बदनामीच्या भितीच्या चिंध्या करून निडरपने पुढं जानारा वाघ एखादाच असतो.. मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय ! शाहरूख, लब्यू भावा. ❤️ – किरण माने.

एनसीबीचं आर्यनबाबत स्पष्टीकरण काय?

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविरोधात पुरावे नसल्याचं ठरवणं हे घाईचं होईल, असं अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने स्पष्ट केलं आहे. आर्यन हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही, असं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबी प्रमुखांनी स्पष्टीकरण दिलं. त्यावरूनच किरण माने यांनी ही पोस्ट लिहिली आहे. यावरून पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचिट? NCBने दिलं स्पष्टीकरण

अजितदादांच्या पीएशी ओळख असल्याचा बनाव, पुण्यात तरुणाला दहा लाखांचा गंडा

वर्धा नदीत आंघोळ करायला गेला मुलगा, बुडताना पाहून आई धावली! मुलासह आईचा बुडून मृत्यू

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.