या वयात नीट उभं राहता येत नाही आणि आजीबाई गाण्यावर थिरकतायत, डान्सने घातला धुमाकूळ!

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. लोकं यावर चांगलीच प्रतिक्रिया देतायत.

या वयात नीट उभं राहता येत नाही आणि आजीबाई गाण्यावर थिरकतायत, डान्सने घातला धुमाकूळ!
Dadi dancing in bus
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 07, 2022 | 2:10 PM

आजच्या काळात सोशल मीडियाची क्रेझ प्रचंड आहे. काही इतके गोंडस असतात की ते त्यांच्या त्यांच्या नादात त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आयुष्य जगत असतात आणि मग त्यांचा कुणीतरी व्हिडिओ शूट करतं. असा व्हिडिओ मग प्रचंड व्हायरल होतो. यात लहान मुलं आणि म्हातारे लोकं यांचं प्रमाण जास्त असतं. असाच एक गोंडस हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी बसमध्ये अतिशय सुंदर डान्स करत आहे.

असं म्हणतात की, जेव्हा एखादी व्यक्ती आनंदी असते तिने नाचलं पाहिजे, तेव्हा त्याची दु:खं आपोआपच दूर होतात. मग वय कोणतंही असलं तरी हरकत नाही. कारण वय फक्त एक संख्याच आहे.

असाच एक व्हिडिओ आजकाल आपल्याला पाहायला मिळतोय ज्यात बसमध्ये वाजणाऱ्या गाण्यावर एक आजी धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.

दादीचं नृत्यकौशल्य आणि आत्मविश्वास अप्रतिम आहे, तिला पाहून प्रत्येकजण म्हणत आहे की, तिने कुठूनतरी डान्स प्रशिक्षण घेतलंय.

आजीचे जबरदस्त एक्सप्रेशन आणि ठुमके पाहून लोक खूश झालेत, लोक व्हिडिओचं भरभरून कौतुक करतायत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजी बसमध्ये वाजणाऱ्या गाण्यावर डान्स करू लागते.

या व्हिडिओतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या वयात लोकांना नीट बसता येत नाही, त्या वयात ही अम्मा एकापेक्षा एक भन्नाट स्टेप्स करताना दिसतीये.

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. लोकं यावर चांगलीच प्रतिक्रिया देतायत.