Elon Musk च्या Halloween Outfit वरून Twitter वर धुमाकूळ! मिम्सचा पाऊस

नेमकं हे कोणतं आउटफिट आहे यात सगळे गोंधळलेत. याच कारणामुळे नेटकऱ्यांनी स्वतःच त्याच्या आउटफिटला नाव द्यायला सुरुवात केलीये.

Elon Musk च्या Halloween Outfit वरून Twitter वर धुमाकूळ! मिम्सचा पाऊस
elon musk halloween
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 02, 2022 | 9:06 AM

आज एलन मस्कला कोण ओळखत नाही? तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. आता तर तो अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनलाय. आपल्या वक्तव्यांनी आणि कृतीने तो नेहमीच चर्चेत असतो. आता ट्विटरच्या चर्चेनंतर तो आणखी एकदा चर्चेत आलाय. यावेळी कारण जरा मजेशीर आहे.

31 ऑक्टोबरला हॅलोविनचा दिवस होता. एलन मस्कही एका वेगळ्या अवतारात दिसला. त्याने ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो हॅलोविन आउटफिट घालून दिसलाय. इतकंच काय तर त्याची आईसुद्धा य फोटोत आहे. हा फोटो पाहून नेटकरी सक्रिय झालेत.

एलन मस्क चा हा आउटफिट लोकांना संभ्रमात टाकणारा आहे. नेमकं हे कोणतं आउटफिट आहे यात सगळे गोंधळलेत. याच कारणामुळे नेटकऱ्यांनी स्वतःच त्याच्या आउटफिटला नाव द्यायला सुरुवात केलीये.

काही लोक त्याला मार्वल सुपरहिरो म्हणत आहेत. काहींनी त्याची तुलना ‘आयर्न मॅन’शी केली आहे, तर काही युजर्सही त्याचा नवा अवतार पाहून मीम्स शेअर करण्यात आनंद घेत आहेत.