
अमेरिकेतील मिशिगनमध्ये, मॅकडोनाल्ड्समधील एका महिला कर्मचाऱ्याने रागाच्या भरात तिच्या मॅनेजरची चाकूने वार करून हत्या केली. 26 वर्षीय अफेनी मुहम्मद हिने महिला मॅनेजर जेनिफर हॅरिस हिच्यावर चाकूने 15 वार केले आहेत. ज्यामुळे जेनिफर हिचं वयाच्या 39 व्या वर्षी निधन झालं आहे. ही घटना 12 जुलै रोजी घडली आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. अफेनी हिच्या कामगिरीमुळे मॅनेजर तिला वारंवार कामावरून लवकर घरी पाठवत होती याचा आफेनीला राग होता. घटनेच्या एक दिवस आधी म्हणजे 11 जुलै रोजी आफेनीने तिच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती तिच्या मॅनेजर जेनिफर हॅरिसबद्दल रागाने बोलत होती.
रिपोर्टनुसार, हल्ला करण्याच्या एक दिवस आधी, अफेनी हिने एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये अफेनी हिने मॅनेजर हॅरिस हिच्यावर अनेक आरोप केले होता. मॅकडोनाल्डच्या माजी कर्मचाऱ्याला तिच्या कामगिरीमुळे लवकर घरी पाठवण्यात आल्यानंतर ती नाराज झाली.
व्हिडिओमध्ये मॅकडोनाल्डचा कर्मचारी अफेनी मुहम्मद तिच्या व्हिडिओमध्ये म्हणाली, “काल मला लवकर घरी पाठवण्यात आले. आजही तिने मला लवकर घरी पाठवलं. मी तुम्हाला सांगतो, ती एक वाईट महिला आहे, हा काही विनोद नाही. तिला हे समजून घ्यायला हवे की ती आई आहे आणि तिला मुले आहेत म्हणून ती दुकानातील लोकांचा अनादर करू शकते, सगळे तिच्यापेक्षा कमी दर्जाचे आहेत असं तिला वाटतं, सर्वांना खाली खेचण्याचा प्रयत्न ती करू शकत नाही.”
McDonald’s Manager and Mother of 6 Stabbed to Death by This Employee pic.twitter.com/cXd4pzt0Zk
— The Facts Dude (@The_Facts_Dude) July 11, 2025
पुढे अफेनी म्हणाली, ‘तिच्या मनात जराही कोणाबद्दल आदर नाही. ती मला पुन्हा पुन्हा घरी पाठवत राहते, हा विनोद नाहीये.’ एवढंच नाही तर, अफेनी हिने तिच्या मॅनेजरवर नकारात्मक ऊर्जा पसरवण्याचा आरोप केला आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅरिस हिने पुन्हा अफेनी हिला घरी जाण्यास सांगितलं. पण अफेनी हिने हॅरिसला परत येईल असं सांगितलं. त्यानंतर अफेनी तिच्या गाडीकडे गेली आणि चाकू घेतला. त्यानंतर ती मॅकडोनाल्डच्या दुकानात परत गेली आणि मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. ड्राईव्ह-थ्रूमधून जाणाऱ्या एका ग्राहकाने हा हल्ला पाहिला आणि तिला थांबवण्यासाठी हवेत गोळीबार केला.
न्यायालयात सुनावनी दरम्यान, अफेनी म्हणाली, अफेनीने 3 इंचापेक्षा जास्त लांबीचा चाकू बाहेर काढला आणि पीडितेवर अनेक वेळा, सुमारे 15 वेळा वार केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. हॅरिसवर वार केल्यानंतर, अफेनीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण ग्राहकांनी तिला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
शुक्रवारी आफेनीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आणि जामिनाची रक्कम २५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे २० कोटी रुपये निश्चित केली आहे.