दिव्या भारतीच्या आईला माहित होतं लेकीच्या मृत्यूचं मोठं रहस्य! जाणून व्हाल हैराण
Divya Bharti Death: दिव्या भारतीच्या मृत्यूचं मोठं रहस्य आईला होतं माहिती, लेकीच्या निधनानंतर आई मीता भारती यांनी केलेला 'तो' मोठा खुलासा... आजही दिव्या भारती कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत

Divya Bharti Death: बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती हिच्या निधनाल आज अनेक वर्ष झाली आहेत. वयाच्या अवध्या 19 व्या वर्षी अभिनेत्री अखेरचा श्वास घेतला. फार कमी काळात दिव्या भारती हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण जेव्हा अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारती हिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली.
रिपोर्ट्सनुसार, दिव्याचा मृत्यू तिच्या अपार्टमेंटचा पाचवा मजला कोसळल्याने झाला. पण, हे गूढ अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीची आई मीता भारती यांनी एका मुलाखतीत लेकीच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा केला होता. लेकीच्या मृत्यूबद्दल मीता भारती यांनी मोठी माहिती दिली होती. मुलाखतीत मीता भारती यांनी सांगितल्यानुसार, दिव्या भारतीच्या कुंडलीत आधीच अकाली मृत्यूचा योग होता. मी याकडे दुर्लक्ष केलं आणि ते आम्ही विसरुन गेलो. मीता भारती म्हणाल्या, भविष्यवाणी तेव्हाच आठवली जेव्हा तिची मुलीचं निधन झालं…
5 एप्रिल 1993 रोजी मुंबईतील वर्सोवा येथील पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, तिच्या मृत्यूचं कारण डोक्याला गंभीर दुखापत आणि जास्त रक्तस्त्राव हे होतं. पोलिसांनी तो अपघात मानला, पण हत्या की आत्महत्या? अशा तुफान चर्चा तेव्हा सुरु होत्या.
दिव्या भारती हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 1990 मध्ये तेलुगू सिनेमांमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या दिव्या भारतीचंही लहान वयातच लग्न झाले. तिने निर्माता साजिद नाडियावाला यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या 1 वर्षानंतर अभिनेत्रीचं निधन झालं.
दिव्या भारती हिच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेत्रीचा पती साजिद नाडियाडवाला याच्यावरही अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. पण आता साजिद नाडियाडवाला त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.
दिव्या भारती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 9 वीत असताना दिव्या भारतीने शिक्षण सोडलं आणि मॉडेलींगला सुरुवात केली. वयाच्या 14 व्या वर्षी दिव्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय मॉडेल म्हणून नावारुपास आली. त्यानंतर दिव्याने तेलूगू ‘बोब्बिली राजा’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. ज्यामुळे दिव्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.
