AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Story | Gay Couple | लग्नाच्या बेडीत अडकले ते दोघंही ‘गे’, त्यांच्या लग्नाचा अल्बम एकदा बघून तर घे…!

अभय आणि सुप्रियोचं 8 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं. अखेर त्यांनी तेलंगणात शाही लग्न केलं. या लग्नात इतर लग्नाप्रमाणेच जय्यत तयारी करण्यात आली होती. यजमानी होता. पाहुणेमंडळी होते.

Photo Story | Gay Couple | लग्नाच्या बेडीत अडकले ते दोघंही 'गे', त्यांच्या लग्नाचा अल्बम एकदा बघून तर घे...!
तुझी माझी जोडी जमली...
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Dec 20, 2021 | 7:14 PM
Share

‘आम्ही आता ऑफिशलीअली एकमेकांचे झालो’, अशी घोषणा करत भारतातील एका समलैंगिक जोडप्यानं जंगी पार्टी दिली आहे. या पार्टीचं त्यांच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे कुटुंबीयही (Family) या सोहळ्यात सहभागी होते. त्यांच्या संमतीनच हा शाही सोहळा पार पडला, ही सुंदर गोष्ट अधोरेखित करायलाच हवी!

शुभमंगल सावधान!

इतर लग्न (Marriage) सोहळ्यांसारखाच हा सोहळाही उत्साहात पार पडला. प्रेमाची (Love Story) ही गोष्ट स्वीकारण्यासाठी, मोठं मन लागतं. स्वीकार करण्याची वृत्ती लागते. चांगल्या आणि स्पष्ट विचारांची माणसं लागतात. हे सगळं असणाऱ्या मंडळींनी अभय (Abhay) आणि सुप्रियो (Supriyo) या समलैंगिक जोडप्याच्या लग्नात धम्माल केली.

ल्गन म्हटलं की संगीत आलंच!

प्रेम लपून ठेवायची गोष्ट थोडीच आहे? प्रेम तर सुंदर गोष्ट आहे. ती खुलेआम केली पाहिजे. हे अभय आणि सुप्रियोलाही माहीत होतंच. त्यामुळेच त्यांनी आपला जंगी विवाहसोहळा केला.

आयुष्यभर लक्षात राहावा, असा क्षण साजरा

अधिकृतपणे एकमेकांचे झालेल्या अभय आणि सुप्रियोंचा हा तेलंगणात झालेला विवाह… बहुदा देशातील पहिलाच समलैंगिक विवाह असू शकतो.

भारतील पहिलाचं समलैंगिक विवाह? बहुतेक हो!

प्रेम ही अमर्याद गोष्ट आहे. विलक्षण सुंदर गोष्ट आहे. अशाच प्रेमात अभय आणि सुप्रियो गेल्या काही वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. एकमेकांवर मनापासून प्रेम करत आहेत. त्यांनी एकमेकांचा स्वीकार केलाय.

प्रेमाचं प्रतीक असलेली अंगठी

आठ वर्षांपूर्वी एका डेटिंग ऍपद्वारनं एकमेकांची ओळख होऊन अभय आणि सुप्रियोची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

डेटिंग ऍपवर भेट

आता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबतच घालवण्याचा निर्णय एक पार्टी देऊन जगजाहीर केलाय. अभय आणि सुप्रियोसाठी ही पार्टी म्हणजे लग्नसोहळाय!

तुझी माझी जोडी जमली…

सुप्रियो हैदराबादच्या एका हॉटेल मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये लेक्चरर आहे. तर अभय एका सॉफ्टवेअर कंपनीत डेव्हलपर आहे. दोघंही चांगलं कमावतात. समाज काय म्हणेल म्हणून त्यांनी स्वतःची फसवणूक केली नाही. प्रेम करण्यासाठी धाडस लागतं. ते त्यांनी दाखवलं.

आपलं प्रेम स्वीकारलं जावं, यासाठी आपल्या कुटुंबीयांनाही त्यांना विश्वासात घेतलं. विरोध स्वाभाविक होता. पण विरोधाचा सामना करत अखेर कुटुंबीयांना विश्वासात घेतल्यानंतर अभय आणि सुप्रियो यांचा थाटामाटात विवाह सोहळा पार पडला.

वडीलधाऱ्यांचेही आशीर्वाद

तेलंगणातील विक्रमाबाद हायवेच्या ट्रान्स ग्रीनफिल्ड रिसॉर्टमध्ये या विवाहाच्या निमित्तानं अभय आणि सुप्रियोच्या मित्रमैत्रिणींना आनंदसोहळा अनुभवला. रंग, रुप यासोबतच लिंग फार महत्त्वाचं नाहीये! प्रेम या सगळ्याच्या पलिकडची गोष्ट आहे, हे अभय डांगे आणि सुप्रियो चक्रबोर्ती यांनी जगाला दाखवून दिलंय.

अधिकृतपणे एकमेकांचे झालेल्या अभय आणि सुप्रियोंचा हा तेलंगणात झालेला विवाह… बहुदा देशातील पहिलाच समलैंगिक विवाह असू शकतो. तो असेलच असा काही आमचा दावा नाही.. पण काही चांगल्या गोष्ट पहिल्या घडत असत, तर त्याचं कौतुक करायला हरकत काय?

समलैंगिक विवाहाबाबात कायदा काय सांगतो?

भारतात अजूनतरी समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आलेली नाही. याप्रकणी न्यायालयीन लढा अजूनही सुरु आहे. मात्र समलैंगिक संबंध ठेवणं हा कायद्यानं गुन्हा नसेल, असा निर्वाळा 2018 साली सुप्रीम कोर्टानं दिला होता. त्यामुळे दोन व्यक्ती एकमेकांशी समलैंगिक संबंध ठेवू शकतात. पण एकमेकांशी अधिकृतपणे लग्न करु शकत नाही. सध्या अस्तित्त्वात असलेल्या विवाहासंबंधिच्या कायद्यांसोबत समलैंगिक विवाहाला मान्यता दिली जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात केला होता.

दिल्ली हायकोर्टात एका याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेतून समलैंगिक विवाहांना मान्यता दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही याचिका न्यायप्रविष्ट असून त्यावर लवकरच निर्णय होणं अपेक्षित आहे. मात्र तूर्तासतरी भारतात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही.

पाहा अभय आणि सुप्रियोच्या लग्नाचा ग्रॅन्ड व्हिडीओ –

इतर बातम्या –

Lord Shiva Puja | आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सोमवारी हे उपाय नक्की करुन पाहा

Ind vs SA: द्रविड सरांनी घेतला टीम इंडियाचा क्लास, नेटमध्ये कसून सराव करताना खास Photos

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे वैतागलेल्या ग्राहकांचा मोर्चा CNG गाड्यांकडे, पाहा टॉप 3 सीएनजी कार

Realme ते Samsung, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार 5G स्मार्टफोन

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती