पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे वैतागलेल्या ग्राहकांचा मोर्चा CNG गाड्यांकडे, पाहा टॉप 3 सीएनजी कार

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा CNG वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपला मोर्चा CNG गाड्यांकडे वळवला आहे.

Dec 20, 2021 | 5:52 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Dec 20, 2021 | 5:52 PM

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे वैतागलेल्या ग्राहकांचा मोर्चा CNG गाड्यांकडे, पाहा टॉप 3 सीएनजी कार

1 / 6
आज आम्ही तुम्हाला देशातील काही सर्वात स्वस्त सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत. अधिक मायलेज, प्रीमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाइनसह उपलब्ध असलेल्या देशातील टॉप 3 कार्सबद्दल माहिती देणार आहोत.

2 / 6
नवी दिल्लीत ALTO S-CNG ची एक्स-शोरूम किंमत 4.46 लाख रुपये आहे. कार देखो वेबसाइटनुसार, ही कार एक किलो सीएनजी गॅसवर 31.59 किमी इतकं मायलेज देते. यासोबतच यात 796 सीसी इंजिन देण्यात आले आहे. ही कार 40.36 bhp पॉवर देते. या कारमध्ये 4 प्रवासी आरामात बसू शकतात. तसेच यात मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या कारला 177 लीटर बूट स्पेस मिळते.

3 / 6
Maruti S Presso ही एक परवडणारी कार आहे, जी लहान कुटुंबासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. कंपनीने ही कार तीन व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. या कारचे इंजिन 998 cc क्षमतेचे आहे. ही कार 1.0 लीटर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. कारमधील इंजिन 68 PS पॉवर आणि 90 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकतं.

4 / 6
यात 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही कार 1 किलो CNG मध्ये 31.2 किमी मायलेज देते. मारुती एस्प्रेसोची किंमत 3.78 लाख रुपयांपासून सुरू होते जी टॉप मॉडेलमध्ये 5.43 लाख रुपयांपर्यंत जाते.

5 / 6
Hyundai Santro Magna CNG 5.99 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम, दिल्ली) खरेदी केली जाऊ शकते. ही कार 1 किलोमध्ये 30.48 किमी मायलेज देते. या कारमध्ये 1086 cc चे इंजिन देण्यात आले आहे. तसेच ही कार 59.17 बीएचपी पॉवर जनरेट करू शकते. यात 5 सीटिंग स्पेस आणि 235 लीटर बूट स्पेस आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें