बरं नुसती झोप उडाली, जीव नाही गेला! भयानक व्हिडीओ

आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बरं नुसती झोप उडाली, जीव नाही गेला! भयानक व्हिडीओ
Ghost
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 27, 2022 | 1:56 PM

सोशल मीडियाच्या या युगात अधिकाधिक व्ह्यूज आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओज तयार करतात. व्हिडिओ बनवण्याचा एकच प्रयत्न असतो की लोक पुन्हा पुन्हा पाहतील आणि अधिकाधिक तो व्हिडीओ शेअर करतील. आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस भूत बनतो आणि दुसऱ्या व्यक्तीला घाबरवतो.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रिक्षावर झोपलीये तिथे दुसरा माणूस येतो, ज्याने तोंडाला भुताचा मास्क लावला आहे. भीतीदायक मुखवटा घातलेला हा माणूस झोपलेल्या व्यक्तीची चादर ओढू लागतो.

झोपलेला माणूस उठतो आणि समोर हे भयानक दृश्य पाहतो. समोर भुतासारखी व्यक्ती पाहून रिक्षावर झोपलेला माणूस चांगलाच घाबरतो.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर planet_visit नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे. ६५ हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. तसेच खूप लोकांनी लाईक केले आहे.

या व्हिडिओला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. काहीजण या व्हिडिओचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओमध्ये कमेंट करणाऱ्या काही लोकांनी यावर टीकाही केली आहे. एका युझरने लिहिले की, “हा विनोद नाही तर हल्ला आहे.”