AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्

दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक… कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्

| Updated on: Sep 28, 2026 | 4:42 PM
Share

नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि मुदखेड तालुक्यांना दुष्काळ यादीतून वगळल्याने निर्माण झालेल्या संतापात, भाजप खासदार अशोक चव्हाण यांची एका कार्यकर्त्यासोबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. चव्हाणांनी कार्यकर्त्याला लोकांच्या शिव्या खाण्याचा सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. टीव्ही नाईन मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही.

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत भाजप खासदार अशोक चव्हाण यांची एका कार्यकर्त्याशी फोनवरील कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये, मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांना दुष्काळ यादीतून वगळल्याने जनतेकडून येणाऱ्या टीकेवर चव्हाणांनी कार्यकर्त्याला “दोन दिवस शिव्या खा, काही हरकत नाही” असा धक्कादायक सल्ला दिल्याचे ऐकू येते. नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि मुदखेड हे दोन्ही तालुके दुष्काळातून वगळल्यामुळे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांवर शेतकरी दबाव आणत आहेत.

अनेक ठिकाणी तीव्र दुष्काळ असतानाही हे तालुके वगळल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांनी चव्हाणांकडे याबाबत तक्रार केली असता, त्यांनी लोकांना थोडा संयम राखण्यास आणि टीकेला सामोरे जाण्यास सांगितले. या ऑडिओ क्लिपमध्ये चव्हाण कार्यकर्त्याला “मुदखेड तालुका दुष्काळात शंभर टक्के येणार” असे आश्वासनही देत आहेत. मात्र, सुरुवातीला हे तालुके का वगळले गेले, याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. या क्लिपमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. टीव्ही नाईन मराठी या व्हायरल क्लिपच्या सत्यतेची खात्री करत नाही.

Published on: Sep 28, 2026 04:42 PM

Follow Us