AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंनी उठाव केला नसता तर…; शिंदेसेनेच्या आमदाराने भाजपला आरसाच दाखवला, मोठा दावा करत म्हणाले…

Chandrakant Raghuvanshi News: एकनाथ शिंदेंनी उठाव केला म्हणून भाजप सत्तेत आला आहे, असा चंद्रकांत रघुवंशींना दावा केला आहे. या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

शिंदेंनी उठाव केला नसता तर...; शिंदेसेनेच्या आमदाराने भाजपला आरसाच दाखवला, मोठा दावा करत म्हणाले...
| Updated on: Sep 28, 2026 | 4:42 PM
Share

महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस तापलेलं दिसून येत आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका आमदाराने खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदेंनी भापजला जिवंत केलं असल्याचं ते म्हणाले आहे. यानंतर त्यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे. शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, भाजपला जिवंतच एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. नाहीतर भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न राहिला नसता. महाविकास आघाडीच्या काळात भाजप सत्तेत कुठे होता? एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतरच भाजप सत्तेत आला, असा दावा चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

चंद्रकांत रघुवंशी यांनी विजयकुमार गावितांवरही टीका केली आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यामुळेच डॉ. विजयकुमार गावित यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच डॉ. विजयकुमार गावित यांची लॉटरी लागली. गावितसाहेब अडीच वर्षे आदिवासी विकास मंत्री राहिले आहेत, असं म्हणत रघुवंशी यांनी गावितांवर निशाणा साधला आहे.

भाजपच्या सत्तेपासून ते गावितांच्या मंत्रि‍पदापर्यंत चंद्रकांतरघुवंशींच्या या वक्तव्याने नंदुरबारच्या राजकारणात नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. रघुवंशींच्या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये भाजपबद्दल हे विधान केलं आहे. यामुळे आता राजकारण पुन्हा ढवळून निघणार आहे.

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान