AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Juhi Chawla: जुही चावलाने 6 वर्षे लपवून ठेवली लग्नाची बातमी, नेमकं कारण तरी काय?

Juhi Chawla: एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणून जुही चावला ओळखली जाते. पण तिने लग्न केल्याची बातमी जवळपास 6 वर्षे सर्वांपासून लपवली. आता त्यामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Juhi Chawla: जुही चावलाने 6 वर्षे लपवून ठेवली लग्नाची बातमी, नेमकं कारण तरी काय?
जुही चावलाImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 10:01 AM
Share

८०च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या जुही चावलाची गणना ९०च्या दशकातील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये होते. तिने केवळ आपल्या दमदार अभिनयानेच नव्हे तर पडद्यावरील चुलबुली अदांनीही थेट प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. जरी दीर्घकाळापासून जुही चावला बॉलिवूडपासून दूर असली तरी त्या कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. ती केवळ बॉलिवूडच नव्हे तर भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीपैकी एक आहे.

जुही चावला आज ५९वा वाढदिवस आहे. तिने आपल्या अभिनय करिअरमध्ये अक्षय कुमार, ऋषी कपूर, अजय देवगण, गोविंदा, आमिर खान, शाहरुख खान यांसह अनेक मोठ्या सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर केली आहे. चला, आज अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया. तसेच तिची नेटवर्थ किती आहे हेही जाणून घेऊया…

वयाच्या १७ वर्षाव्या वर्षी झाली मिस इंडिया

जुही चावलाचा जन्म १३ नोव्हेंबर १९६७ रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. लहान वयातच तिने मॉडेलिंग सुरू केले होते. १९८४ मध्ये तिने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि केवळ १७ वर्षांच्या वयात हा किताबही आपल्या नावावर केला. १७ वर्षांच्या वयात मिस इंडिया झाल्यानंतर जुही चावलाने १९ वर्षांच्या वयात बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यास सुरुवात केली होती. अभिनेत्रीने ‘सल्तनत’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. १९८६ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिने अभिनेता सनी देओलसोबत स्क्रीन शेअर केली होती.

६ वर्षे लपवून ठेवली लग्नाची बातमी

जुही चावलाने १९९५ मध्ये स्वतःहून सुमारे ८ वर्षांनी मोठे व्यवसायी जय मेहता यांच्याशी लग्न केले होते. मात्र तिने ६ वर्षे त्यांनी ही आनंदाची बातमी जगापासून लपवून ठेवली. तिला भीती होती की जर तिच्या लग्नाबद्दल लोकांना कळले तर त्याचा करिअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तेव्हा जुहीचे करिअर यशाच्या शिखरावर होते. जुही आणि जय यांना दोन मुले आहेत – एक मुलगी जान्हवी आणि एक मुलगा अर्जुन.

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री जुही चावला

आयपीएल संघ ‘कोलकाता नाइट रायडर्स’मध्ये जुही चावलाचाही महत्त्वाचा वाटा आहे. ती या संघाची सह-मालक आहे. यामुळे तिची चांगली कमाई होते. याशिवाय अभिनेत्रीने सौराष्ट्र सिमेंट, रेस्टॉरंट आणि रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्येही गुंतवणूक केली आहे. हुरुन रिच लिस्ट २०२५ नुसार त्यांची नेटवर्थ ७,७९० कोटी रुपये आहे आणि इतक्या संपत्तीसह ती देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'