AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक संसदेचे अधिवेशन? मोदी सरकारच्या मनात काय? दिल्लीत मोठी घडामोड

Special Parliament Session : हिवाळी अधिवेशनाचे पडघम वाजण्यापूर्वीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची दाट शक्यता असल्याचा दावा करण्यात येत आहे. दिल्लीत पुन्हा घाडमोडींना वेग आला आहे. विरोधी गोटातील काही पक्षांशी संपर्क साधण्यात येत असल्याचीही माहिती समोर येत आहे. काय आहे अपडेट?

अचानक संसदेचे अधिवेशन? मोदी सरकारच्या मनात काय? दिल्लीत मोठी घडामोड
अचानक संसदेचे अधिवेशन? मोदी सरकारच्या मनात काय? दिल्लीत मोठी घडामोड
| Updated on: Nov 13, 2026 | 9:39 AM
Share

Special Parliament Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चर्चेपूर्वीच विशेष अधिवेशनाचे पडघम वाजू लागले आहेत. माहितीनुसार, मोदी सरकार हिवाळी सत्रापूर्वी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवू शकते. परिसीमन, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक (Delimitation Bill) आणि महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) संसदेच्या पटलावर मांडून ती मंजूर करण्याची कसरत पुन्हा करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासाठी पुन्हा INDIA आघाडीतील काही नेत्यांशी संपर्क करण्याचाही प्रयत्न झाल्याचे समजते. अर्थात याविषयीची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण या अनुषंगाने दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे.

मागील चुका टाळण्याचा प्रयत्न

मागील अधिवेशनात विरोधक आणि सरकारमध्ये अनेक विधेयकावर दिलजमाई झाली नाही. यापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. त्यामुळे सरकारला मोठा धक्का बसला होता. अतिविश्वास सरकारला नडल्याची चर्चा होती. आता दोन्ही सभागृहात केलेल्या चुका यावेळी टाळण्याचे आणि विरोधकांनाही विश्वासात घेण्याचे धोरण असल्याची गोटातील माहिती समोर येत आहे. विरोधकांच्या मनातील किंतू आणि परंतू दूर करून त्यांनाही बाजू मांडण्याची संधी दिली जाऊ शकते. मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसपासून इतर काही पक्षांसोबत या विषयावर चर्चेच्या फेऱ्याहून विरोधकांच्या मनातील प्रश्न, शंका दूर करण्याचाही प्रयत्न झाल्याचे समजते. आता इंडिया आघाडीतील कोणते घटक पक्ष सरकारला सहकार्य करतील हे आताच सांगता येणार नाही. पण सरकारने प्रतिकूल मत अनुकूल करण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष अधिवेशनासाठी सरकारचे पाऊल

संसदेचे विशेष सत्र बोलावण्यासाठी किमान 14 दिवस अगोदर खासदारांना नोटीस द्यावी लागते. पण एक बाजू समोर येत आहे. पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने सरकारविरोधात जोरदार मोर्चा उघडला. सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ही कोंडी फोडण्यात सरकारला मोठे यश आले नाही. या पावसाळी अधिवेशनात संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. पण सत्राची समाप्ती झाली नव्हती. या तांत्रिक बाबीचा विचार करता सरकार अचानक विशेष सत्र बोलावू शकते, अशी एक बाजू समोर येत आहे. दरम्यान नोव्हेंबरच्या अखेरीस अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'