AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शरद पवार टायमिंग साधणार? अजित पवार गटाला विलीनीकरणाची ऑफर, तटकरेंच्या विधानाने चित्र स्पष्ट

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीचं विलीनीकरण तसेच एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना शरद पवारांनी ब्रेक लावला आहे. त्यावर आता सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोठी बातमी! शरद पवार टायमिंग साधणार? अजित पवार गटाला विलीनीकरणाची ऑफर, तटकरेंच्या विधानाने चित्र स्पष्ट
sharad pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 28, 2026 | 4:43 PM
Share

राष्ट्रवादीचं विलीनीकरण तसेच एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष  शरद पवारांनी ब्रेक लावला आहे. पवारांनी विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे. कुणाला यायचं असेल तर आमच्या या असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून एक प्रकारे राष्ट्रवादी अजित पवार गटाला ऑफरच देण्यात आली आहे. तसेच दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मोठं विधान केलं आहे. सत्तेत जाण्यापेक्षा विरोधात राहणंच योग्य असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?

अजितदादांच्या नेतृत्वामध्येच एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी जे काही मत व्यक्त केलं असेल त्यावर मी काही बोलणार नाही, असं यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान शरद पवार यांनी ही भूमिका आत्ताच का मांडली? त्या मागे काय राजकीय अर्थ असू शकतो? असाही प्रश्न यावेळी सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना तटकरे यांनी म्हटलं की, शरद पवार यांचं टायमिंग हे त्यांनाच माहिती. अनेकदा पवारांनी राजकारणात टायमिंग साधलं आहे. 80 च्या दशकात, 90 च्या दशकात 2010 च्या नंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने टायमिंग साधलेलं आहे, त्यामुळे आता पवारांच्या विधाना मागचं नेमकं टायमिंग काय आहे, हे साहेबांनाच माहिती असंही यावेळी सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील विलीनीकरणासंदर्भात मोठं विधान केलं होतं. विलीनीकरण झालं तर एकाच अटीवर होईल, ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटानेच आमच्या पक्षात यावं? यावर देखील यावेळी सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शशिकांत शिंदे यांनी नेमकं काय विधान केलं ते मी ऐकलं नाही. पण ते जर तसं काही बोलले असतील तर ते त्यांच्या पुरतंच मर्यादित आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखालीच आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळालं. त्यामुळे ते वक्तव्य त्यांच्या पुरतंच मर्यादित आहे. आम्ही कालही एनडीएमध्ये होतो, आजही एनडीएसोबत आहोत आणि भविष्यातील आमची वाटचाल ही एनडीएसोबतच असेल, असं विधान यावेळी सुनील तटकरे यांनी केलं आहे.

Follow Us
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?