AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | राहत्या घरात तरुणीचा थरारक स्टंट, केलं असं काही की व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओमध्ये एक तरुणी थरारक स्टंट करत आहे. या तरुणीने घरातील पायऱ्यांसमोर एक झोका बांधला आहे. झोक्यावर बसून ती खेळत आहे. मात्र अचानकपणे या तरुणीने झोक्यावरून खाली उडी मारली आहे. तसेच पुढच्याच क्षणी या तरुणीने पुन्हा एकदा उलटी उडी घेतली असून ती झोक्यावर परत जाऊन बसली आहे.

Viral Video | राहत्या घरात तरुणीचा थरारक स्टंट, केलं असं काही की व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
GIRL STUNT VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 8:24 AM
Share

मुंबई : स्टंट करणं ही काही सोपी गोष्ट नाही. एखादा स्टंट करुन दाखवण्यासाठी प्रचंड सराव लागतो. मेहनत लागते. मात्र आजकाल तरुणालाईला वेगवेगळे स्टंट करुन दाखवणं चांगलंच आवडतं. तरुण-तरुणी स्टंटबाजी करुन त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर हमखास अपलोड करत असतात. सध्या तर एक अजब गजब असा स्टंट व्हायरल होतोय. एका तरुणीने हा स्टंट केलाय.

तरुणीकडून थरकाप उडवणारा स्टंट 

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ तर आपल्याला अवाक् करणारा आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी थरारक स्टंट करत आहे. या तरुणीने घरातील पायऱ्यांसमोर एक झोका बांधला आहे. झोक्यावर बसून ती खेळत आहे. मात्र अचानकपणे या तरुणीने झोक्यावरून खाली उडी मारली आहे. तसेच पुढच्याच क्षणी या तरुणीने पुन्हा एकदा उलटी उडी घेतली असून ती झोक्यावर परत जाऊन बसली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स  

काही समजायच्या आत तरुणी झोपाळ्यावर परत जाऊन बसली असून हा अजब स्टंट लोकांना चांगलाच आवडलाय. हा व्हिडीओ ट्विटवर @akaCurt या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तर व्हिडीओ पाहून नेटकरीदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अशा प्रकारची कलाकारी याआधी कधी पाहिली नाही असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर तरुणीने केलेला स्टंट आश्चर्यचकित करणारा आहे, असे दुसऱ्या एका युजरने म्हटलंय.

इतर बातम्या :

मध्य प्रदेश पोलिसांचा अजब कायदा, लांब मिशा ठेवल्या म्हणून हवालदाराचे निलंबन, सोशल मीडियावर एकच चर्चा

Viral : माकडाची फुग्यांसोबत मस्ती, Video पाहून अनेकांना आठवलं त्यांचं बालपण

इच्छा तिथे मार्ग! कॉफी बनवण्याचे हे देशी जुगाड पाहिलं का?, व्हिडीओ व्हायरल

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली