मुलगीच बनली वडिलांची चाैथी बायको, थेट सांगितले कारण, वडिलांची दुसरी..
नुकताच हैराण करणारा प्रकार पुढे आला. एका मुलीने आपल्याच वडिलांसोबत लग्न केले. हेच नाही तर ती आपल्या वडिलांची चाैथी पत्नी बनली आहे. हा निर्णय नक्की का घेतला हे देखील तिने सांगितले. यामागील कारण काय यावर स्पष्ट बोलताना ती दिसली.

मुलगी आणि वडिलांचे नाते सर्वात पवित्र मानले जाते. वडील आपल्या मुलांसाठी दिवसरात्र कष्ठ करतात. आपल्या मुलांना चांगले भविष्य मिळावे, याकरिता वडील स्वत:चे सुख सोडून कष्ट करतात. बऱ्याचदा मुलीच्या लग्नासाठी वडील कर्ज काढतात आणि आयुष्यभर त्या कर्जाची परतफेड करतात. मुलांवरील प्रत्येक संकट आपल्यावर यावे, ही आई वडिलांची इच्छा असते. त्यातच मुली आणि वडिलांचे नाते तर फार जास्त वेगळे असते. मुलगी कधीच आपल्या वडिलांना दु:खात पाहू शकत नाही. मुलापेक्षा वडिलांचा जीव जास्त मुलीवर असतो. मात्र, एक नुकताच अशी घटना घडली, ज्याने सर्वचण हैराण झाले. चक्क मुलीने आपल्या वडिलांसोबतच लग्न केले. मुलगी आपल्या स्वत:च्या वडिलांची चाैथी पत्नी झाली.
मुलीने वडिलांसोबत लग्न केल्याने त्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. वडिलांचे तीन लग्न अगोदरच झाली होती. चाैथी पत्नी मुलगीच बनली. अखेर या मुलीने असे का केले? आपल्या वडिलांची पत्नी ती का बनली, यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. त्यातच मुलीने यावर भाष्यही केले. वडिलांसोबत लग्न करणाऱ्या मुलीचे नाव राबिया आहे.
राबिया ही पाकिस्तानची रहिवासी आहे. आता राबियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राबिया मॉलमध्ये तिच्या वडिलांसोबत पोहोचली. यावेळी काही प्रसारमाध्यमे या लग्नाबद्दल तिला विचारत होते. यावेळी राबिया हिने मोठे विधान केले. राबिया ही तिच्या वडिलांची दुसरी मुलगी आहे. वडिलांसोबतच्या लग्नाबद्दल तिला विचारले असताना तिने म्हटले की, माझं नाव राबिया आहे.
राबिया म्हणजे चाैथी मुलगी… पण मी माझ्या वडिलांची दुसरी मुलगी होते. मी चाैथी मुलगी तर बनू शकत नाही म्हणून मी त्यांची चाैथी पत्नी बनले. मला माझ्या नावाला न्याय द्यायचा होता, त्याकरिता मी हे केले. राबिया हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक तिच्या या बोलण्यावरून तिला चांगलेच सुनावत आहेत. तिचे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला.