VIDEO | कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू, अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी

| Updated on: May 24, 2021 | 1:08 PM

देवाला सोडलेल्या घोड्याच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी बेळगावात शेकडो नागरिक उपस्थित राहिले होते. (funeral of Horse Maradimath Belagavi)

VIDEO | कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू, अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी
घोड्याच्या अंत्यदर्शनाला गर्दी
Follow us on

बेळगाव : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी बेळगावात देवाला सोडलेल्या घोड्याचा मृत्यू झाला. घोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील हजारो नागरिक उपस्थित राहिले होते. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अंत्यसंस्कारात सहभागी असलेल्या सर्वांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाणार आहे. (Hundreds of People gather at the funeral of Horse in the Maradimath area of Belagavi)

मरडीमठ येथे देवाला घोडा सोडला

कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत असून नागरिक मात्र प्रशासनाने कोरोना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन करायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील मरडीमठ येथे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला घोडा सोडण्यात आला होता. या घोड्याच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी गावातील शेकडो नागरिक उपस्थित राहिले होते.

घोड्याचा शनिवारी मृत्यू

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील मरडीमठात पवाडेश्वर महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा घोडा सोडण्यात आला होता.
बुधवारी मध्यरात्री 12 ते गुरुवारी सकाळी 4 वाजेपर्यंत हा घोडा सोडण्यात आला. दैवी घोडा कोरोना व्हायरसपासून रक्षण करण्यासाठी सोडण्यात आला होता. या घोड्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.

अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी

शनिवारी रात्री घोड्याचे निधन झाल्यानंतर मरडीमठ आणि कोन्नूर ग्रामस्थांनी मिळून या देवी घोड्याचे अंत्यसंस्कार केले. कोरोनामुळे एकीकडे लॉकडाऊन असताना 400 ते 500 गावकरी देवाच्या घोड्याच्या अंत्यदर्शनासाठी जमले होते. दरम्यान, अंत्ययात्रेवेळी गर्दी करु नका असं सुरुवातीला आवाहन केले होते. मात्र, अंत्यविधीला हजारोहून अधिक गावकरी उपस्थित असल्याने आयोजकांसह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्वी मलेरिया आणि प्लेग यासारख्या साथीच्या रोगांचे निवारण होण्यासाठी असे घोडे देवाला सोडले जात असत. 51 वर्षांपूर्वी मठात रात्रीच्या वेळी संचारासाठी घोडा सोडण्यात आला होता.

उपस्थितांची रॅपिड अँटीजेन चाचणी 

बेळगावचे एसपी लक्ष्मण निंबरगी आणि तहसीलदारांनी कोन्नूर गाव आणि मरडीमठ 14 दिवस सीलडाऊन केले आहे. दैवी घोडाच्या अंत्यसंस्कारात सहभागी असलेल्या सर्वांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाणार आहे. या परिसरातील जवळपास चारशे घरांची तपासणी होणार आहे. कोव्हिड, सारी किंवा इलीचा संसर्ग झाला का, याची तपासणी केली जाणार आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नाला तुफान गर्दी, अनेकांच्या तोंडावर मास्क नाही, कोरोना नियम नेमके कुणासाठी?

आंध्रप्रदेशमध्ये कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी अनेक राज्यांमधून तुफान गर्दी, ICMR तपासणी करणार

(Hundreds of People gather at the funeral of Horse in the Maradimath area of Belagavi)