
असे म्हणतात की, जे उत्साही आहेत त्यांच्यासाठी वय ही केवळ एक संख्या असते. म्हातारपणीही ते आपल्या तरुणपणी ज्या उत्साहाने जगत असत, त्याच उत्साहाने आयुष्य जगतात. त्याचबरोबर अशी लोकं जेव्हा प्रेमात असतात तेव्हा ते खूप उत्साहात आणि आनंदात असतात. सध्या अशाच एका वयोवृद्ध जोडप्याचा सोशल मीडियावरील व्हिडिओ लोंकांचं लक्ष वेधून घेतोय. ज्यामध्ये एक 70 वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नीला आकर्षित करण्यासाठी ‘द बीस्ट’ चित्रपटातील ‘अरबी कुथु’ गाण्यावर एकदम उत्साहाने नाचताना दिसतोय.
व्हायरल क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, घराच्या हॉलमध्ये खुर्चीवर एक महिला बसलेली आहे. तिचा 70 वर्षीय पती मस्तीच्या मूडमध्ये आहे.
या व्हिडीओमध्ये वृद्ध व्यक्ती ‘अरबी कुथु’ या गाण्यावर आपल्या डान्स मूव्ह्जने आपल्या पत्नीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
आपण पाहू शकता की हे आजोबा एकदम बिनधास्त होऊन नाचतायत.त्यांची ऊर्जा पाहण्यासारखी आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही एक गोंडस हसू येईल.
वृद्ध दाम्पत्याचा हा अतिशय क्यूट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर optimistic_chatterbox नावाच्या अकाऊंटसोबत शेअर करण्यात आला आहे.
युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जर तुम्ही तुमच्यातील मुलाला जिवंत ठेवले तर तुमच्या आजूबाजूला नेहमीच आनंदाचे वातावरण असेल. तुम्हा लोकांच्या विनंतीवरून मी हे अपलोड केले आहे. ७० च्या दशकातील माझे अम्मा आणि अप्पा.”
काही सेकंदांची ही क्लिप इंटरनेट विश्वात धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून आतापर्यंत 7.7 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.
त्याचबरोबर व्हिडिओवर 10 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या सतत वाढत आहे. याआधी एका वृद्धाचा सालसा करतानाचा व्हिडिओ खूप गाजला होता, ज्यात त्या पुरुषाची महिला डान्सरसोबतची एनर्जी पाहण्यासारखी होती.