AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चारही मुलीच म्हणून नवऱ्याने घरातून हाकललं, आज बायको लाखोंची मालकीण, पण कसं शक्य झालं?

चारही मुली म्हणून नवऱ्याने सोडलं, घर नाही, पैसा नाही... बायकोला सर्वकाही संपलं असं वाटलं, रण आज ती आहे लाखोंची मालकीण, पण कसं शक्य झालं? चार मुलींसोबत महिलेने दिला अनेक संकटांना तोंड...

चारही मुलीच म्हणून नवऱ्याने घरातून हाकललं, आज बायको लाखोंची मालकीण, पण कसं शक्य झालं?
| Updated on: Oct 14, 2025 | 11:36 AM
Share

आज आपण म्हणतो मुलगा आणि मुलगी दोघे देखील समान आहेत. एकीकडे आज प्रत्येक ठिकाणी महिला देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. तर दुसरीकडे आजही मुलींना वाईट वागणूक मिळते. मुलगा आणि मुलगी दोघे देखील समान आहेत… असं अनेक ठिकाणी आपण पाहतो… पण मुलींना स्वतःला सिद्ध करुन दाखवावं लागतं… असंच एका महिलेसोबत देखील झालं आहे. चारही मुलीच झाल्यामुळे नवऱ्याने घरातून हाकललं… अशात शिक्षण नाही, नोकरी नाही… उत्पन्नाचं साधन नाही आणि चार मुलींची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर महिलेने मोठा निर्णय घेतला आणि ती आज लाखो रुपयांची मालकीण आहे. एवढंच नाही तर, महिलेने अन्य महिलांना देखील रोजगार दिला आहे.

अशा कठीण परिस्थितीचा सामना ज्या महिलेने केला त्या महिलेचं नाव यास्मिन बेगम असं आहे. नवऱ्याने घरातून काढल्यानंतर यास्मिन हिने ठरवलं की, आयुष्यात यापुढे कधीच कोणावर अवलंबून राहायचं नाही. यास्मिन हिने सांगितल्यानुसार, सुरुवातील यास्मिन हिला त्रास झाला. पण तिने नवीन सुरुवात केली.

यास्मिन हिला शिवणकाम आणि भरतकामाची आवड होती, म्हणून तिने जुन्या शिलाई मशीनवर छोटे कपडे शिवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला, परिसरातील महिला त्यांचे कपडे शिवण्यासाठी तिच्याकडे येऊ लागल्या. हळूहळू, लोकांना तिचं काम आवडू लागलं आणि ऑर्डर वाढू लागल्या. सुरुवातील, यास्मिन दिवसाला 2 – 3 कपडे शिवायची… त्यामुळे घर चालवणं कठीण झालं होतं. पण हळू – हळू यास्मिनच्या मेहनतील यश मिळू लागलं… अशात काही पैसे जमा करुन यास्मिन हिने नवीन शिलाई मशिन घेतली आणि घरातून व्यवसाय सुरु केला. आता गावातील अन्य 10 – 12 महिला यास्मिन हिच्यासोबत काम करतात.

आज, यास्मिन केवळ स्वतःसाठी पैसे कमवत नाही तर इतरांना रोजगार देखील देते. ती ब्लाउज, सूट, पेटीकोट, कुर्ता-पायजामा, मुलांचे कपडे आणि बरंच काही शिवते. सणासुदीच्या काळात तिला इतके ऑर्डर मिळतात की तिला रात्रंदिवस काम करावं लागतं. आता यास्मिन हिचं मानसिक उत्पन्न 40 – 50 हजार रुपये आहे. तर वर्षाला ती लाखो रुपये कमावते.

यास्मिन म्हणजे, नवऱ्याने सोडलं तेव्हा वाटलं आता सर्वकाही संपलं आहे. आयुष्य संपलं आहे. पण आता वाटतं माणसाने ठरवलं तर तो सर्वकाही करु शकतो. गोंडा जिल्ह्यातील लोक आता यास्मिन बेगमला “धैर्यवान महिला” म्हणतात. तिनं सिद्ध केलं आहे की कठीण काळातही जर एखादी व्यक्ती खंबीर राहिली तर ती स्वतःचं नशीब घडवू शकते.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.