दिग्दर्शकाचं 13 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध, स्वतःचं काळे रहस्य उघड करत म्हणाला, ‘आतापर्यंत मी 350 महिलांसोबत…’
दिग्दर्शकावर गंभीर आरोप, काम देण्याच्या बहाण्याने अभिनेत्रींचं शोषण, 13 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध, स्वतःचं काळे रहस्य उघड करत म्हणाला, 'आतापर्यंत मी 350 महिलांसोबत...', सर्वत्र दिग्दर्शकाच्या खासगी आयुष्याची चर्चा...

बॉलिवूडमध्ये 2018 मध्ये आलेल्या ‘मीटू’ वादळामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेत्रींनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप केलं. असंच काही दिग्दर्शक साजिद खान याच्यासोबत झालं आहे. त्याच्यावर मी टू अंतर्गत अनेक गंभीर आरोप करण्यात आले. याशिवाय साजिद खान नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. अनेक अभिनेत्रीसोबत दिग्दर्शकाचं नाव देखील जोडण्यात आलं.
साजिद खान याचं नाव अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण त्याआधी साजिद अभिनेत्री गौहर खान हिला डेट करत होता. दोघांच्या लग्नाच्या चर्चांची देखील जोर धरलेला. साजिद आणि गौहर यांचा साखरपुडा देखील झाला होता. पण दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.
स्वतःच्या काळ्या रहस्यांवर साजिद याचं मोठं वक्तव्य
एका मुलाखतीत साजिद याने गौहर खान हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलेलं. ‘”आम्ही एक वर्ष एकत्र होतो. ती एक चांगली मुलगी आहे. मला शोमध्ये सार्वजनिकरित्या नावं सांगायला आवडत नाही, पण जगाला त्याबद्दल माहिती असल्याने, ते ठीक आहे. आमच्या साखरपुड्याची मीडियामध्येही चर्चा झाली.”
साजिद पुढे म्हणाला, ‘माझे आतापर्यंत 350 लग्न व्हायला हवी होते. जेवढ्या मुलींसोबत मी राहिलो आहे, त्या मुली आजही मला मिस करत असतील, माझ्याबद्दल वाईट देखील बोलत असतील..’ सांगायचं झालं तर, साजिद खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर, गौहर खान तिच्या कारकिर्दीत पुढे गेली आणि रिअॅलिटी शोच्या जगात प्रवेश केला.
साजिद याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर गौहर हिचं नाव कुशाल टंडन याच्यासोबत जोडलं जाऊ लागलं. दोघांनी एकमेकांना डेट देखील केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. गौहर खानने 2020 मध्ये झैद दरबार याच्यासोबत लग्न केले. या लग्नापासून त्यांना जहान नावाचा मुलगा आहे आणि लवकरच ते त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत.
गौहर खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
