IAS Awanish Sharan: आयएएस अधिकाऱ्याच्या नजरेतून “यश”! सगळ्यांनाच पटेल असा व्हिडीओ

असं म्हणतात की आयएएस अधिकारी फक्त अभ्यासू नसतात. त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जीवनाचा अर्थच कळून चुकतो.

IAS Awanish Sharan: आयएएस अधिकाऱ्याच्या नजरेतून यश! सगळ्यांनाच पटेल असा व्हिडीओ
IAS Awanish Sharan Video
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 04, 2022 | 12:05 PM

यशाची व्याख्या प्रत्येकानुसार वेगवेगळी असते. यश आणि अपयश प्रत्येकाला सारखंच असतं असं नाही. असं म्हणतात की आयएएस अधिकारी फक्त अभ्यासू नसतात. त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जीवनाचा अर्थच कळून चुकतो. ती परीक्षाच एक “चांगलं व्यक्तिमत्त्व” तयार करण्यासाठीची असते. एका आयएएस अधिकाऱ्याने एक खूप अर्थपूर्ण व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओत यशाची व्याख्या सांगितलीये. व्हिडीओचं वैशिष्ट्य असं की ही यशाची व्याख्या त्या त्या वयासाठी मर्यादित आहे. म्हणजेच हा व्हिडीओ सगळ्यांनाच रिलेट करतो. कारण आपण प्रत्येक जण आयुष्यात त्या वळणावर पोहचलेलो असतो.

व्हिडिओ क्लिपमध्ये बालपण आणि प्रौढ पणामध्ये किती आश्चर्यकारक साम्य आहे हे दर्शविले गेले आहे. अवनीश शरणच्या जबरदस्त व्हिडिओने ट्विटरवरील लोकांच्या हृदयाला स्पर्श केलाय.

140 सेकंदाच्या या क्लिपची सुरुवात बाळाच्या एक वर्षाच्या वयापासून होते, लहान मुलाचे सर्वात मोठे यश कोणत्याही आधाराशिवाय चालणे हे आहे.

यशाचा अर्थ व्यक्तीच्या वयानुसार बदलत जातो आणि जेव्हा आयुष्याचे अंतिम टप्पे सुरू होतात, तेव्हा ते अनुक्रमे सुरुवातीच्या वयासारखेच होते.

शेअर झाल्यानंतर काही तासांतच या व्हिडिओला 3.8 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. 14,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

यावर अनेक लोकं व्यक्त झालेत. एक व्यक्ती व्हिडीओ बघितल्यावर कमेंट करतो, “हे खरे आहे! पण दु:खद गोष्ट ही आहे की प्रत्येकजण ही वस्तुस्थिती काळाबरोबर विसरतो.”