अनेकदा एकटेपणा जाणवतो, या भावना कोणाला सांगण्यासारख्या…IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा VIDEO व्हायरल

एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा व्हिडिओ समोर आलाय. लोक हा व्हिडिओ शेअर करतायत. अनेकदा एकटेपणा जाणवतो. आपली स्वत:ची ओळख तर मिटणार नाही ना, ही भिती सतावते. या भावना कोणाला सांगण्यासारख्या वाटत नाहीत.

अनेकदा एकटेपणा जाणवतो, या भावना कोणाला सांगण्यासारख्या...IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा VIDEO व्हायरल
IAS Officer Wife
Updated on: Dec 03, 2025 | 1:29 PM

सोशल मीडियावर अचानक एखादा व्हिडिओ चर्चेमध्ये येत असतो. अलीकडेच एक क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिप लोकांना विचार करायला भाग पाडणारी आहे. व्हिडिओमध्ये एक महिला दिसते. लोक या महिलेला IAS अधिकाऱ्याची पत्नी म्हणून ओळखतात. बाहेरुन आपल्याला असं वाटतं की, मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबाचं आयुष्य आरामदायक, मान-सन्मान, प्रतिष्ठेने भरलेलं आहे, काही अडचणी नाहीत. त्यांचं विश्व इतरांपेक्षा वेगळं असेल असं आपल्याला वाटतं. पण एक महिला कॅमेऱ्यासमोर जितक्या सहजतेने बोलली, त्यातून आपली धारणा किती चुकीची आहे, हे लक्षात येतं. महिलेच्या साधेपणाने आणि सहजतेने लोकांना इतकं प्रभावित केलं की, तो व्हिडिओ लाखोवेळा शेअर करण्यात आलाय.

तु्म्ही एका IAS अधिकाऱ्याची पत्नी आहात, म्हणून तुमचं आयुष्य अजिबात सोपं नाहीय असं ही महिला व्हिडिओमध्ये मोकळेपणाने मान्य करते. तिच्या शब्दात एक खरेपणा आहे. जो थेट ह्दयाला भिडतो. बाहेरुन भले माझं आयुष्य आरामदायी वाटत असेल, पण वास्तवात अनेक आव्हानं आहेत. अनेकदा एकटेपणा जाणवतो. आपली स्वत:ची ओळख तर मिटणार नाही ना, ही भिती सतावते. या भावना कोणाला सांगण्यासारख्या वाटत नाहीत. पण हे सुद्धा वास्तव आहे.

सोशल मीडियावर पाऊल ठेवण्याची हिम्मत दाखवली

तिने ठरवलं की, आपल्या विश्वातून बाहेर पडून आपला आवाज, विचार समोर आणणं गरजेचं आहे. याच विचारामुळे तिने सोशल मीडियावर पाऊल ठेवण्याची हिम्मत दाखवली. सुरुवात खूप साधारण होती. फक्त वेळ घालवण्यासाठी म्हणून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. कुठला मोठा प्लान नव्हता किंवा अपेक्षा नव्हती. फक्त रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करायची. घरातल्या गोष्टी, दीनचर्येतील अनुभव अशा गोष्टींकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो.


एकटेपणा किंवा ओळख मिटण्याची भिती व्यक्त केली

हळू-हळू सोशल मीडियाची ही जर्नी छोटीशी सुरुवात मोठ्या मंचामध्ये बदलली. लोकांना तिचा कंटेट आवडू लागला. कमेंटसमध्ये ते त्यांच्या स्टोरी शेअर करु लागले. अनेक महिलांनी पुढे येऊन त्यांच्या भावना सांगितल्या. एकटेपणा किंवा ओळख मिटण्याची भिती व्यक्त केली. पहिल्यांदा कुठल्या अधिकाऱ्याच्या पत्नीला इतक्या मोकळ्यापणाने बोलताना पाहतोय, असं प्रेक्षकांनी सांगितलं. कुठलाही संकोच न बाळगता आपला कमकुवतपणा, भिती आणि आपलं वास्तव आयुष्य समोर मांडत आहे.