VIRAL NEWS : कष्टकरी आई-वडिलांच्या घामाचं चीज करणारं पोर! डोळ्याचं पारणं फेडणारं मोत्यासारखं सुंदर हस्ताक्षर, वाचा काय लिहिलंय

"बघताक्षणीच डोळ्याचं पारणं फेडणारं मोत्यासारखं हे सुंदर हस्ताक्षर कोणा कॅलिग्राफी आर्टिस्टचं किंवा एखाद्या शिक्षकाचं नाही, तर चौथीत शिकणाऱ्या सार्थक बटुळे या लहानग्याचं आहे.

VIRAL NEWS : कष्टकरी आई-वडिलांच्या घामाचं चीज करणारं पोर! डोळ्याचं पारणं फेडणारं मोत्यासारखं सुंदर हस्ताक्षर, वाचा काय लिहिलंय
viral news
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 02, 2023 | 1:39 PM

अहमदनगर : सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये एका मुलाच्या सुंदर अक्षराची जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे त्या लहानग्याचं नावं सार्थक बटुळे (Sarthak batule) असं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी (Ahmadnagar Pathardi) तालुक्यातील भारजवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत तो शिकत आहे. त्याचे आई-वडिल ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेले आहेत. आईवडिलांच्या कष्टांना खऱ्या अर्थाने न्याय देतोय अशी पोस्ट सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाली आहे.

“बघताक्षणीच डोळ्याचं पारणं फेडणारं मोत्यासारखं हे सुंदर हस्ताक्षर कोणा कॅलिग्राफी आर्टिस्टचं किंवा एखाद्या शिक्षकाचं नाही, तर चौथीत शिकणाऱ्या सार्थक बटुळे या लहानग्याचं आहे. आपल्या पाथर्डी तालुक्यातील भारजवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सार्थकने हस्ताक्षर स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलाय, त्याबद्दल त्याचे मनापासून अभिनंदन! त्याचे आई-वडील सध्या ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेले आहेत. पण आपल्या या यशातून तो आपल्या आईवडिलांच्या कष्टांना खऱ्या अर्थाने न्याय देतोय आणि भविष्यात तो नक्कीच यशाची मोठी शिखरे गाठेल, यात शंकाच नाही! सार्थक, तुला उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!” असा आशय त्याच्या व्हायरल पोस्टमध्ये लिहिला आहे.

viral post