Video: ट्रॅक्टरची नाही तर बाईकची ट्रॉली, शेतकऱ्याने केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने दुचाकीला जोडता येईल अशी ट्रॉली बनवली आहे. आता या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video: ट्रॅक्टरची नाही तर बाईकची ट्रॉली, शेतकऱ्याने केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
जुगाड करुन बनवलेली बाईकची ट्रॉली

जगभरात अनेक प्रकारचे जुगाड केले जातात. बऱ्याचदा लोक असे जुगाड करतात, की जेणेकरून त्यांचं अशक्य काम किंवा कठीण काम सोपं होतं. अशा जुगाडांचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. लोकांना असे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात. आज आम्ही आणखी एका देसी जुगाडचा व्हिडीओ दाखवणार आहोत, जो चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल, की गावची लोक लई हुशार असतात. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने दुचाकीला जोडता येईल अशी ट्रॉली बनवली आहे. आता या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ( Man amazing jugaad converts bike into tractor trolly internet loves it see viral video)

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, दुचाकी उभी आहे आणि ट्रॅक्टरप्रमाणेच डिझाइन केलेली ट्रॉलीही त्या बाईकच्या मागे उभी आहे. जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक आणि आरामात पाहिला, तर तुम्हाला दिसेल की बाईकच्या मागील भागाला एक जाड रॉड आहे, ज्याचं एक टोक या ट्रॉलीला जोडलेलं आहे. बाईकला अटॅच करून बनवलेली ही ट्रॉली माल वाहून नेण्यासाठी उपयोगी आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खूप मजेदार कमेंट्स करत आहेत.

व्हिडीओ पाहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by JUGAAD (@jugaadu_life_hacks)

व्हायरल होणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या jugaadu_life_hacks या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर बहुतेकांनी असा कल्पनेला भन्नाट म्हटलं आहे.

लोक त्या व्यक्तीच्या मनाची स्तुती करत आहेत. कमेंटमध्ये लिहताना एक व्यक्ती म्हणाला की, ही व्यक्ती खूप प्रतिभावान आहे. दुसर्‍याने लिहिले – जरी गावातील लोक फार सुशिक्षित नसले, तरी त्यांच्याकडे खूप बुद्धी आणि कल्पकता आहे. याशिवाय अनेकांनी इमोजीजद्वारे आपल्या कमेंट्स दिल्या आहेत.’

हेही पाहा:

Video: बकरीच्या पिलासोबतचा सेल्फी व्हिडीओ बनवत होता, तितक्यात बकरीच्या पिलाने जे केलं, त्याने लोक लोटपोट झाले!

Video: डोळ्यावर गॉगल, हातात ट्रॅक्टरचं स्टिअरिंग, आणि जोईचा भन्नाट स्वॅग, ट्रॅक्टर चालवणारा कुत्रा जगभरात का गाजतोय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI