AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: डोळ्यावर गॉगल, हातात ट्रॅक्टरचं स्टिअरिंग, आणि जोईचा भन्नाट स्वॅग, ट्रॅक्टर चालवणारा कुत्रा जगभरात का गाजतोय?

मेंढ्यांना चरायला नेण्यापासून ते नर्सरीतून पिकांची रोपं शेतापर्यंत नेण्यासाठी लागणारा ट्रॅक्टर हा कुत्रा चालवतो. ऑस्ट्रेलियातल्या स्टॅफोर्डशायर शहरात हा कुत्रा आहे. या कुत्र्याच्या स्वॅग पाहूनच अनेकजण त्याच्यावर फिदा झाले आहेत.

Video: डोळ्यावर गॉगल, हातात ट्रॅक्टरचं स्टिअरिंग, आणि जोईचा भन्नाट स्वॅग, ट्रॅक्टर चालवणारा कुत्रा जगभरात का गाजतोय?
ट्रॅक्टर चालवणारा कुत्रा जोई
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 6:19 PM
Share

तुम्ही कधी ट्रॅक्टर चालवणाऱ्या कुत्र्याबद्दल ऐकलं आहे? नसेल ऐकलं तर आज आम्ही तुम्हाला ट्रॅक्टर चालवणाऱ्या कुत्र्याबद्दल सांगणार आहोत. मेंढ्यांना चरायला नेण्यापासून ते नर्सरीतून पिकांची रोपं शेतापर्यंत नेण्यासाठी लागणारा ट्रॅक्टर हा कुत्रा चालवतो. ऑस्ट्रेलियातल्या स्टॅफोर्डशायर शहरात हा कुत्रा आहे. या कुत्र्याच्या स्वॅग पाहूनच अनेकजण त्याच्यावर फिदा झाले आहेत. ( dog drives a tractor in the field shows swag after wearing pink frock australia farmer viral video)

जोई ‘द वंडरडॉग’ म्हणून ओळख

स्टॅफोर्डशायरमध्ये, जोई नावाचा एक हुशार कुत्रा आहे. जो केवळ स्केटबोर्डिंगच करू शकत नाही, तर समुद्रात सहज सर्फिंगदेखील करू शकतो. जोईकडे खूप प्रतिभा आहे, परंतु त्याचं सर्वात चांगले काम म्हणजे कोणत्याही मदतीशिवाय ट्र्रॅक्टर चालवणं. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमधील त्याच्या मालक ब्रायन रीचेल्टच्या रोपवाटिकेत हा हे कर्तब करतो. त्यामुळेच त्याला ‘द वंडरडॉग’ म्हणूनही ओळख मिळाली आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता, कुत्र्याने गुलाबी रंगाचा फ्रॉक आणि सनग्लासेस घातला आहे आणि ट्रॅक्टर चालवत असल्याचे दिसून येते.

पाहा जोईचा जुना व्हिडीओ:

कुणाच्याही मदतीशिवाय ट्रॅक्टरवर कमांड

डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जोने आपले दोन्ही पाय ट्रॅक्टरच्या स्टिअरिंगवर ठेवले आहेत, तर मागील दोन पाय बसण्याच्या जागेवर शिल्लक ठेवले आहेत. तो त्याच्या आजूबाजूला इकडे -तिकडेही पाहतो. भाजीपाला ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आला आहे, जोई तो शेतातून घेऊन जात आहे.

जोई’चं इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंट

हा व्हिडिओ पहिल्यांदा मार्च 2018 मध्ये समोर आला होता. पण नुकताच टिकटॉकवरही याचा व्हिडीओ पोस्ट झाला आहे, टिकटॉकवर भारतात बंदी असल्याने त्याचा जुनाच व्हिडीओ आपण पाहू शकतो. टिकटॉकच्या व्हिडीओत ब्रायनने लिहिले आहे की, ‘ ट्रॅक्टरवर काम करण्याचा हा माझा पहिला अनुभव आहे आणि मी ते करण्यासाठी खूप उत्साहित आहे.’ जोईचे स्वतःचे इन्स्टाग्राम खातं आणि फेसबुक पेज आहे. जिथे ब्रायन त्याच्या सर्व मनोरंजक गोष्टी शेअर करत राहतो. यात पोहणे, स्केटबोर्डिंग आणि सर्फिंगचे उत्तम व्हिडिओ देखील आहेत.

हेही पाहा:

Video: झोक्यावर चढले आणि तोंडावर आपटले, अस्वलांचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

Video: महाकाय व्हेल बोटीजवळ आली, महिलेसोबत खेळली, बोटीला धक्काही दिला, वाढदिवसाच्या दिवशीच महिलेसोबत भर समुद्रात काय काय झालं?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.