Video: बकरीच्या पिलासोबतचा सेल्फी व्हिडीओ बनवत होता, तितक्यात बकरीच्या पिलाने जे केलं, त्याने लोक लोटपोट झाले!

सेल्फी घेण्याची अनेकांना सवय असते, कधी कधी त्या नादात दुर्घटनाही घडतात, पण कधी कधी असे प्रसंग घडतात की, कुणालाही हसू आवरणार नाही. अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे

Video: बकरीच्या पिलासोबतचा सेल्फी व्हिडीओ बनवत होता, तितक्यात बकरीच्या पिलाने जे केलं, त्याने लोक लोटपोट झाले!
एक व्यक्ती बकरीच्या पिलासोबत सेल्फी व्हिडीओ शूट करत आहे

इंटरनेटवर कधी कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून असं घडू शकतं यावर विश्वास बसत नाही. कधी कधी प्राणी माणसांशी असं वागतात, की जसं त्यांना खूप जास्त कळतं. कदाचित हे खरंही आहे, फक्त आपल्याला त्यांची भाषा समजत नाही. पण तरीही काही प्रसंगात त्यांचं वागणं समजून येतं. काही लोक अशा प्रसंगांचे व्हिडीओ करतात, जे नंतर इंटरनेटवर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही तुमचं हास्य आवरु शकणार नाहीत. (Man take selfie with goat funny video goes viral on social media)

सेल्फी घेण्याची अनेकांना सवय असते, कधी कधी त्या नादात दुर्घटनाही घडतात, पण कधी कधी असे प्रसंग घडतात की, कुणालाही हसू आवरणार नाही. अशाच एका प्रसंगाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बकरीचं पिल्लू सेल्फी घेणाऱ्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

सेल्फी घेण्याचा प्रयत्न

या व्हिडीओत एक व्यक्ती बकरीच्या पिलासोबत सेल्फी व्हिडीओ शूट करत आहे. तेवढ्यात बकरीच्या पिलू त्याच्याकडे पाहून ओरडू लागतं. त्याला काहीतरी सांगायचं आहे, पण या व्यक्तीला ते कळत नाही. तो व्यक्ती पिलाशी बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे पिल्लू त्याला आपल्या आवाजात उत्तरंही देतं. हा व्हिडीओ पाहून असं वाटतं की, बकरीच्या पिलाला सेल्फी व्हिडीओ घेणं आवडलेलं नाही. त्यामुळे तो व्हिडीओ नको घेऊ असं सांगतो आहे. तेवढ्यात हा व्यक्ती पिलाला विचारतो तुला किस हवाय का, तर यावर बकरीचं पिल्लूही उत्तर देतं. आणि अगदी त्याच्या तोंडाजवळ येऊन त्याला किस देतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

‘@ViralHog’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. व्हायरल हॉग या इन्स्टाग्राम पेजवरुन असे अनेक भन्नाट व्हिडीओ शेअर केले जातात, जे लोकांना खूप आवडतात, हे व्हिडीओ इतर व्हिडीओंहून वेगळे असतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लगेच हसू उमटतं.

हेही पाहा:

Video: डोळ्यावर गॉगल, हातात ट्रॅक्टरचं स्टिअरिंग, आणि जोईचा भन्नाट स्वॅग, ट्रॅक्टर चालवणारा कुत्रा जगभरात का गाजतोय?

Video: झोक्यावर चढले आणि तोंडावर आपटले, अस्वलांचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI