AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पोलिसाच्या गाडीसमोर भन्नाट डान्स, सायरनच्या आवाजावर धरला ठेका, काकांच्या धाडसाची चर्चा

काही लोक डान्सच्या वेडापाई काहीतरी वेगळंच करुन बसतात. शध्या अशाच एका काकांचे डान्सबद्दलचे वेड समोर आले आहे. त्यांनी थेट पोलिसांच्या गाडीमसोर बेभान होऊन डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video | पोलिसाच्या गाडीसमोर भन्नाट डान्स, सायरनच्या आवाजावर धरला ठेका, काकांच्या धाडसाची चर्चा
MAN DANCING VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 9:44 AM
Share

मुंबई : डान्स म्हणजेच नृत्य ही एक अशी कला आहे की जिच्या जोरावर लाखो रुपये कमावता येतात. या जगात डान्स तर प्रत्येकालाच बघायला आवडतो. या कलेले भरपूर वाव असून अनेकजण यामध्ये करिअरसुद्धा करत आहेत. मात्र याच डान्सवेडाचे काही मजेदार किस्से चर्चेचा विषय़ ठरतात. काही लोक डान्सच्या वेडापाई काहीतरी वेगळंच करुन बसतात. शध्या अशाच एका काकांचे डान्सबद्दलचे वेड समोर आले आहे. त्यांनी थेट पोलिसांच्या गाडीमसोर बेभान होऊन डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पोलिसांच्या गाडीसमोर काकांचा डान्स 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र काकांच्या या भन्नाट व्हिडीओची सगळीकडे चर्चा होत आहे. त्याचे कारणही तसेच भन्नाट आहे. व्हिडीओतील काकांनी थेट पोलिसांच्या कारसमोर ठुमके मारले आहेत. एरव्ही पोलिसांची गाडी पाहली की भलेभले धूम ठोकतात. तसेच आपण पोलिसांच्या नजरेत येऊ नयेत म्हणून लपून बसतात. मात्र या आजोबांनी कशाचीह भीती बाळगता पोलिसांसमोरच डान्स केला आहे.

सायरनच्या आवाजावर केला भन्नाट डान्स  

बरं त्यांनी पोलिसांसमोर डान्स केला इथपर्यंत ठीक आहे. मात्र त्यांनी एखाद्याव गाण्यावर नव्हे तर पोलिसांच्या गाडीवर असलेल्या सायरनच्या आवाजावर ठेका धरला आहे. गाडीचे सायरन सुरु होताच व्हिडीओतील काका नाचत आहेत. तसेच सायरन बंद होताच पुन्हा ठेका धरात आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तर पोट धरुन हसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा व्हडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. तसेच भन्नाट अशा कमेंट्स करत आहेत. काकांना डान्स करायला छान वाटत आहे. पण पोलीस बाहेर आल्यावर काका पोलिसांचा मार खातील असी कमेंट एका नेटकऱ्याने दिली आहे. तर हा डान्स अतिशय चांगला आणि भन्नाट असल्याचं दुसऱ्या एका नेटकऱ्याने सांगितलंय. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Viral Video | राहत्या घरात तरुणीचा थरारक स्टंट, केलं असं काही की व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मध्य प्रदेश पोलिसांचा अजब कायदा, लांब मिशा ठेवल्या म्हणून हवालदाराचे निलंबन, सोशल मीडियावर एकच चर्चा

Viral : माकडाची फुग्यांसोबत मस्ती, Video पाहून अनेकांना आठवलं त्यांचं बालपण

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.