VIDEO | बादलीभर बिअर काही सेकंदात फस्त, पाहा हा आवाक करणारा व्हिडीओ

यामध्ये एक व्यक्ती अवघ्या काही सेकंदात डोळ्यादेखत बादलीभर बिअर पितो. या आश्चर्यकारक करामतीला पाहणारे लोकही आवाक होतात (Man Drink More Than Bucket Beer)

VIDEO | बादलीभर बिअर काही सेकंदात फस्त, पाहा हा आवाक करणारा व्हिडीओ
beer
| Updated on: Mar 16, 2021 | 4:17 PM

मुंबई : जगात अनेक असे लोक आहेत ज्यांना नेहमी काहीतरी वेगळं करायचं असतं (Man Drink More Than Bucket Beer). जेणेकरुन ते नेहमी चर्चेत राहावे. अनेकदी अशा लोकांचं कौतुकही केलं जातं तर कधी खिल्लीही उडवली जाते. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही त्यांची चर्चा होते. सध्या या यादीत आणखी एक व्हिडीओ जोडला गेला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. यामध्ये एक व्यक्ती अवघ्या काही सेकंदात डोळ्यादेखत बादलीभर बिअर पितो. या आश्चर्यकारक करामतीला पाहणारे लोकही आवाक होतात (Man Drink More Than Bucket Beer In Just Few Seconds Video Goes Viral ).

या व्यक्तीचं कौशल पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण, ज्या पद्धतीने ही व्यक्ती बादलीभर बिअर पितो आहे त्याने सर्वच चकित झाले आहेत. कारण, साधारणपणे लोक आरामात रिल्रक्स करत एक एक घोट घेत बिअर पितात. त्याला ही व्यक्ती पाण्याप्रमाणे पितो आहे. तिही बादली भरुन बिअर. बादलीत इतकी बिअर होती की त्याचं संपूर्ण चेहरा बिअरमध्ये बुडालेला होता. या व्यक्तीच्या बिअर पिण्याच्या या अंदाजाला पाहून लोकांनी टाळ्यांता गडगडाट केला.

हा व्हिडीओ एकदा बघाच….

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर याचा व्हिडीओ ‘Hold My Beer’नावाच्या अकाउण्टवरुन शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकांसाठी बिअर पिण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती. यामध्ये मोठ्या संख्येत लोकांनी सहभाग घेतला. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

Man Drink More Than Bucket Beer In Just Few Seconds Video Goes Viral

संबंधित बातम्या :

VIDEO | ना लग्न झालं, ना साखरपुडा, तरीही ‘गेली माझी बायको गेली’ का म्हणतायत पोरं, एकदम कडक!

VIDEO | जेव्हा एक जज टोल द्यायला नकार देतो, देश का चर्चा करतोय ह्या क्लिपची?